India Bangladesh

India Bangladesh Relation : भारत-बांग्लादेश तणाव वाढला, दोन्ही देशांनी उच्चायुक्तांना समन्स बजावले

India Bangladesh Relation : बांग्लादेश आणि भारतामधील संबंध बिघडण्याचे कारण जाणून घ्या.

India Bangladesh Relation : काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशमधील वाद विकोपाला गेला आहे. सध्या दोन्ही देशांच्या सीमेवरही तणावाची स्थिती असून, बांग्लादेशने भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावले. यानंतर भारतानेही बांगलादेशच्या उप उच्चायुक्तांना सोमवारी समन्स बजावले. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने बांग्लादेशचे उप उच्चायुक्त नूरल इस्लाम यांना समन्स बजावले होते. बांग्लादेशने भारताच्या उच्चायुक्तांना समन्स बजावल्यानंतर हा घटनाक्रम घडला आहे.

एएनआय वृत्त संस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे. बांग्लादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रविवारी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते. भारत-बांग्लादेश सीमेवर बीएसएफच्या हालचालींबद्दल बांग्लादेशने चिंता व्यक्त केली. दोन्ही देशात सीमावाद सुरू असतानाच हे समन्स बजावण्यात आले होते. गलादेशने म्हटले की, भारत सीमेवर पाच ठिकाणी सुरक्षा कुंपण करण्याचे प्रयत्न करत आहे.

दोन्ही देशात झालेल्या कराराचे उल्लंघन आहे. बांग्लादेश परराष्ट्र मंत्रालयातील भेटीनंतर भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी सांगितले की, या बैठकीत स्मगलिंग, गुन्हेगारी कृत्ये आणि तस्करीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. गुन्हेगारी मुक्त सीमा रेषा करण्याच्या दिशेने चर्चा झाली, अशी माहिती वर्मा यांनी दिली. भारत-बांग्लादेश सीमेवरील चपैनवाबगंज, नौगाव, लालमोनिऱ्हाट आणि तीन बिघा कॉरिडोर येथे बीएसएफच्या कामावर बांगलादेशने आक्षेप घेतला आहे.

श्रीराम मंदिरात 5 हजार कोटींचे दान; कोट्यवधी भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

India Bangladesh Relation

More From Author

Ram Mandir Donation

Ram Mandir Donation : श्रीराम मंदिरात 5 हजार कोटींचे दान; कोट्यवधी भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

Japan Earthquake

Japan Earthquake: जापानच्या क्यूसूमध्ये 6.9 तीव्रतेचा भीषण भूकंप, त्सुनामी अलर्ट जारी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत