Imran Khan Al Qadir Trust Case

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणात कोर्टाने सुनावली 14 वर्षांची शिक्षा

Imran Khan Al Qadir Trust Case: इम्रान खान यांच्यासह त्यांच्या पत्नीला 7 वर्षांची शुक्षा झाली आहे.

Imran Khan Al Qadir Trust case: तुरुंगात बंद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शुक्रवारी पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. अब्जो रुपयांच्या अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानी न्यायालयाने इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुशरा बीबी यांनाही निकालानंतर लगेचच अडियाला तुरुंगातून अटक करण्यात आली. बुशरा बीबी हा निर्णय ऐकण्यासाठी तिथे उपस्थित होत्या. या निर्णयानंतर इम्रान खान समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात मोठा झटका बसला आहे. खानवर सत्तेत असताना सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. तसेच, अल-कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्ट स्थापन करण्याच्या बदल्यात देशाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. इम्रान खान यांना शिक्षेव्यतिरिक्त 10 लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीला 5 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. दरम्यान, इम्रान खानला याच प्रकरणाच मे 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आता आज अखेर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. (Imran Khan Al Qadir Trust case)

काय आहे अल कादिर ट्रस्ट प्रकरण?
पाकिस्तानी जनतेची लुटलेली संपत्ती परत आणू, अशी आश्वासने देत इम्रान खान पाकिस्तानच्या सत्तेत आले. यातील बहुतांश संपत्ती शरीफ आणि झरदारी कुटुंबियांनी परदेशात नेल्याचा आरोप खान वारंवार करायचे. पुढे इम्रान खान पंतप्रधान झाले, पण त्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. 2018 मध्ये ब्रिटनच्या नॅशनल क्राईम एजन्सीने पाकिस्तानातील मोठा जमीन व्यावसायिक मलिक रियाझची मालमत्ता जप्त केली होती.

रियाझवर त्याच्या व्यवसायात अनियमितता केल्याचा आरोप होता. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे 50 अब्ज पाकिस्तानी रुपये आहे. ब्रिटिश सरकारने पाकिस्तान सरकारला पैशाचा योग्य वापर करण्यास सांगितले. खान, हे पैसे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये जमा करून लोकांच्या सेवेसाठी वापरतील, अशी अपेक्षा होती. पण असे झाले नाही. असे म्हटले जाते की, खान यांच्या मंत्रिमंडळाने एक युक्ती शोधून काढली ज्याद्वारे पैसा पाकिस्तानात आला, परंतु थोड्या वेगळ्या मार्गाने. (Imran Khan Al Qadir Trust case)

50 अब्ज रुपयांचा भ्रष्टाचार
ब्रिटन आणि पाकिस्तानमध्ये 50 अब्ज रुपयांबाबत चर्चा सुरू असताना, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात मलिक रियाझविरोधात एक वेगळा खटलाही सुरू होता, ज्यात त्याला 460 अब्ज रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. इम्रानने अशी व्यवस्था करुन ठेवली होती की, रियाझची जप्त केलेली 50 अब्ज रुपयांची संपत्ती पाकिस्तानात येईल, पण दंड म्हणून ती सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात जमा केली जाईल. याचा अर्थ स्पष्ट होता की, 50 अब्ज रुपयांचा करार झाला होता, ज्यामध्ये रियाझचे पैसे आले होते, पण तो त्याचा दंड मानला गेला. हे प्रकरण इथपर्यंत असते, तर कदाचित मुद्दाच निर्माण झाला नसता. खरी कहाणी यानंतर घडली.

4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले
इम्रानने मलिक रियाझला दिलेल्या कथित फायद्याच्या बदल्यात मोठी जमीन स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे करुन घेतली. या जमिनीवर अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्ट बांधण्यात आले. अशाप्रकारे, देशासोबत विश्वासघात करुन मोठ्या प्रमाणात फायदा मिळवण्यात आला होता. याच प्रकरणात आता इम्रान खानला आज शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रानवर शिक्षेची टांगती तलवार असलेला हा चौथा मोठा खटला होता. याआधी, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोशाखाना प्रकरणात (सरकारी भेटवस्तू विकणे), सायफर प्रकरण (अमेरिकन राजदूताने पाठवलेली माहिती लीक करणे), इद्दत प्रकरण (बेकायदेशीरपणे विवाह) प्रकरणात इम्रान खानला दोषी ठरवण्यात आले होते. (Imran Khan Al Qadir Trust case)

न्याय्य निकाल दिल्यास निर्दोष सुटू: पीटीआय अध्यक्ष
न्यायमूर्ती राणा 6 जानेवारी रोजी रजेवर होते, त्यामुळे निर्णय 13 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर न्यायमूर्तींनी न्यायालयात आरोपींच्या अनुपस्थितीचे कारण देत निकाल जाहीर करण्यास पुन्हा 17 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली. सार्वत्रिक निवडणुकांनंतर लगेचच गेल्या वर्षी 27 फेब्रुवारीला खान दाम्पत्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. निकालापूर्वी तुरुंगाबाहेर मीडियाशी बोलताना पीटीआयचे अध्यक्ष बॅरिस्टर गौहर अली खान म्हणाले होते, गेल्या दोन वर्षांत झालेल्या अन्यायाची तुम्ही कल्पना करू शकता. जर न्याय्य निकाल लागला तर इम्रान आणि बुशरा निर्दोष मुक्त होतील.

PM नरेंद्र मोदींची देशातील 65 लाख लोकांना मोठी भेट, मालमत्ता कार्डचे करणार वितरण…

(Imran Khan Al Qadir Trust case)

More From Author

Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अनपेक्षित, अनाकलनीय!

Maharashtra ST

Maharashtra ST : एसटी महामंडळाचा कायापालट होणार; दरवर्षी 5 हजार नवीन Buses खरेदी करणार

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत