ICC Champions Trophy 2025 India Squad : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल.
ICC Champions Trophy 2025 India Squad : बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात बीसीसीआय कार्यालयात प्रदीर्घ चर्चेनंतर 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघात मोहम्मद शमीचीही एन्ट्री झाली आहे. पण, मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल. शुबमन गिल याच्यावर उप कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रिषभ पंत अन् केएल राहुल विकेट किपरच्या रुपात यांना संधी मिळाली आहे, तर संजू सॅमसनचा पत्ता कट झाला आहे. (ICC Champions Trophy 2025)
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उप-कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षेर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा.
यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलअंतर्गत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला पहिला सामना खेळणार आहे. (ICC Champions Trophy 2025)
मोहम्मद सिराजचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही, ही बाब धक्कादायक होती. अर्शदीप सिंगचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय यशस्वी जयस्वालला प्रथमच वनडे संघात संधी देण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघावर नजर टाकली तर तीन सलामीवीर, 2 यष्टीरक्षक, 4 अष्टपैलू, 1 स्पेशालिस्ट फिरकीपटू आणि 3 वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचे हे कॉम्बिनेशन आहे
सलामीवीर (3): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल
फलंदाज (2): विराट कोहली, श्रेयस अय्यर
यष्टिरक्षक (2): केएल राहुल (डब्ल्यूके), ऋषभ पंत (विकेटकीपर)
अष्टपैलू (4): हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर
फिरकीपटू (1) : कुलदीप यादव
वेगवान गोलंदाज (3): जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग,

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 15 सामने होणार
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होणार आहेत. संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांग्लादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. सर्व 8 संघ आपापल्या गटात 3-3 सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना दुबईत, तर दुसरा लाहोरमध्ये होणार आहे. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे सर्व 15 सामने 4 ठिकाणी खेळवले जातील. पाकिस्तानमध्ये 3 स्थळे असतील. तर एक ठिकाण दुबई असेल. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईतच खेळणार आहे. भारतीय संघ पात्र ठरल्यास अंतिम सामनाही दुबईतच होणार आहे. अन्यथा 9 मार्चला लाहोरमध्ये विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. पहिला उपांत्य सामना दुबईत होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. एका सेमीफायनलसह 10 सामने पाकिस्तानमधील 3 ठिकाणी होणार आहेत. लाहोर, कराची आणि रावळपिंडी ही तीन ठिकाणे आहेत. (ICC Champions Trophy 2025)
चॅम्पियन्स ट्रॉफी गट
अ गट – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
ब गट – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक…
19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
1 मार्च- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई
5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर
9 मार्च – फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)
10 मार्च – राखीव दिवस

(ICC Champions Trophy 2025)
एसटी महामंडळाचा कायापालट होणार; दरवर्षी 5 हजार नवीन Buses खरेदी करणार