ICC Champions Trophy

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK सामना कुठे होणार, पाहा…

ICC Champions Trophy 2025 Full Schedule : पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ICC Champions Trophy 2025 Full Schedule Announced: इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. आयसीसीने आधीच स्पष्ट केले होते की, ही आगामी स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत होणार आहे. यामध्ये भारत आपले सामने अन्य कोणत्या तरी देशात खेळणार आहे.

आता आज अखेर आससीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. अशा स्थितीत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामने कोणत्या मैदानावर आणि कधी खेळवले जाणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाईल. (ICC Champions Trophy 2025 Full Schedule Announced)

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होणार आहेत. सर्व संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांग्लादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.

अ गट – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
ब गट – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

(ICC Champions Trophy 2025 Full Schedule Announced)

संपूर्ण वेळापत्रक

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
20 फेब्रुवारी- बांग्लादेश विरुद्ध भारत, दुबई
21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
1 मार्च- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

(ICC Champions Trophy 2025 Full Schedule Announced)

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई
5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च, फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईत खेळला जाईल)

10 मार्च – राखीव दिवस

भारत आणि ऑस्ट्रेलियाने 2-2 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे

2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा हंगाम झाला होता, तेव्हा पाकिस्तानने अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. आता पुढील हंगामात एकूण 8 संघ सहभागी होतील, ज्यात यजमान पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला हंगाम 1998 मध्ये झाला. तेव्हापासून आतापर्यंत 8 हंगाम आले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा 9वा मोसम पुढील वर्षी होणार आहे. 8 पैकी भारत आणि ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 2-2 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने 2002 मध्ये पहिल्यांदा श्रीलंकेसोबत संयुक्तपणे हे विजेतेपद पटकावले होते. यानंतर 2013 मध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. याशिवाय दक्षिण आफ्रिका (1998), न्यूझीलंड (2000), वेस्ट इंडीज (2004), ऑस्ट्रेलिया (2006, 2009) आणि पाकिस्तान (2017) यांनी अशाप्रकारे विजेतेपद पटकावले आहेत.

(ICC Champions Trophy 2025 Full Schedule Announced)

More From Author

Election Commission

Election Commission : महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह, निवडणूक आयोगाने दिले थेट उत्तर

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : अजमेर शरीफ दर्गा वाद चर्चेत; उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत