Hindenburg Research

Hindenburg Research : गौतम अदानींवर आरोप करणारी ‘Hindenburg’ कंपनी बंद; मालकाने केली घोषणा

Hindenburg Research : गौतम अदानी ग्रुपविरोधात कथित घोटाळ्याचा रिपोर्ट आणून चर्चेत असणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Hindenburg Research : गौतम अदानी ग्रुपविरोधात कथित घोटाळ्याचा रिपोर्ट आणून चर्चेत असणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एक्स’वर त्यांनी याबाबतची घोषणा करत त्यांच्या आयुष्यातील प्रवास, संघर्ष आणि यश यावर भाष्य केले आहे. हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबासोबत, मित्रांसमावेत आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन घेतला आहे. आम्ही जो विचार केला होता ते पूर्ण झाल्यावर हे बंद करायचं होते. अखेर आज तो दिवस उजाडला असं सांगत त्यांनी कंपनी बंद करण्याचे घोषित केले.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने जानेवारी 2023 मध्ये समूहावर कॉर्पोरेट गैरव्यवहार आणि शेअरच्या किमतीत फेरफार केल्याचा आरोप केला होता. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे भारतीय उद्योग जगतात खळबळ माजली होती. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्यांना मोठं नुकसान सोसावं लागले होते. (Hindenburg Research)

नेट एंडरसन यांनी त्यांच्या संघर्षाचे दिवस आठवताना म्हटले की, मी जो मार्ग निवडला होता तो सोपा नव्हता याची मला जाणीव नव्हती, मी जोखीम घ्यायला तयार होतो. जेव्हा मी याची सुरुवात केली तेव्हा मी खरेच सक्षम आहे का याची मला शंका होती. कारण माझ्याकडे कुठलाही अनुभव नव्हता. माझं कोणी नातेवाईक या क्षेत्रात नव्हते. मी सरकारी शाळेत शिकलो होतो. मी गोल्फ खेळत नव्हतो. मी सूपरह्युमन नव्हतो जो 4 तासाची झोप घेऊन काम करू शकत होतो असं त्यांनी म्हटलं.

मी माझ्या बहुतेक नोकऱ्यांमध्ये चांगला कर्मचारी होतो, पण बऱ्याचदा माझ्याकडे दुर्लक्ष केले जायचे. जेव्हा मी हे काम सुरू केले तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी कंपनीतून बाहेर पडताच माझ्यावर 3 खटले भरले गेले त्यात माझ्याकडे असलेले उरलेले पैसेही संपले.

जर मला जागतिक दर्जाचे व्हिसलब्लोअर वकील ब्रायन वूड यांचा पाठिंबा मिळाला नसता, ज्यांनी माझ्याकडे आर्थिक क्षमता नसतानाही माझी केस लढवली तर मी सुरुवातीच्या टप्प्यातच अपयशी ठरलो असतो. माझं एक मुल होते, त्यावेळी मला घराबाहेर काढण्याचा सामना करावा लागला असता. मी घाबरलो होतो, पण जर मी शांत बसलो तर मोडून जाईन हे मला माहित होते. माझ्याकडे एकमेव पर्याय होता तो म्हणजे पुढे जात राहणे असंही एंडरसन यांनी सांगितले. (Hindenburg Research)

हिंडेनबर्ग रिसर्च सुरू करताना आम्ही सर्वांनी अचूकतेवर लक्ष केंद्रित करत पुराव्यांवर आधारित भाष्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. कधीकधी याचा अर्थ असा होतो की मोठे संकट ओढावून घेण्यासारखे होते. आमची लढाई आमच्यापेक्षा कितीतरी मोठ्या व्यक्तींशी होती. फसवणूक, भ्रष्टाचार आणि नकारात्मकता अनेकदा जबरदस्त वाटते. (Hindenburg Research)

सुरुवातीला न्यायाची भावना सहसा अशक्य होती, परंतु जेव्हा ती घडली तेव्हा ती अत्यंत समाधानकारक होती. शेवटी, आम्ही आमच्या कामाचा प्रभाव पाडला. मी सुरुवातीला विचार केला होता त्यापेक्षा खूपच जास्त. आमच्या कामाच्या माध्यमातून नियामकांनी जवळजवळ 100 व्यक्तींना दिवाणी किंवा फौजदारी खटल्यात आणले आहे. आम्ही काही साम्राज्यांना हादरवून टाकले ज्यांना हादरवून टाकण्याची गरज होती, ज्यात अब्जाधीशांचा समावेश होता असंही एंडरसनने म्हटले.

जॅक डोर्सीही हिंडेनबर्गचा बळी
अदानी समूहानंतर शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सीला आपला बळी बनवले. मार्च 2023 मध्ये, जॅक डोर्सीच्या फर्म, ब्लॉकच्या शेअर्समध्ये 20 टक्के घट झाली. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात आरोप केला आहे की ब्लॉक इंक आपल्या युजर्स आणि सरकारची फसवणूक करत आहे. यामध्ये डोर्सी यांच्यावर चुकीची आकडेवारी जाहीर करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला होता. ब्लॉक इंकची अर्ध्याहून अधिक खाती बनावट आहेत. परंतु, कंपनीने युजर्सची संख्या फुगवली असल्याचा दावा केला होता. (Hindenburg Research)

अशा फसवणुकीतून जॅक डोर्सीने 5 अब्ज डॉलर्सचे व्यावसायिक साम्राज्य उभारले असल्याचा आरोप हिंडनबर्ग यांनी केला होता. या अहवालानंतर, ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाली, कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसात 6.5 अब्ज डॉलर्सने कमी झाले.

हिंडेनबर्गने कार्ल इकानवर कोणते आरोप केले?
हिंडेनबर्ग रिसर्चने मे 2023 मध्ये, आपल्या अहवालात कार्ल इकान यांची कंपनी पॉन्झी स्कीमसारखी योजना चालवत असल्याचा आरोप केला. ज्याद्वारे गुंतवणूकदारांना लाभांश दिला जात असल्याचा दावा करण्यात आला होता. हिंडेनबर्गच्या या रिपोर्टनंतर, कार्ल इकानच्या कंपनीचे मूल्य 10 अब्ज डॉलर्स (8,64,71,50,00,000 रुपये) पेक्षा जास्त कमी झाले. कारण, त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

(Hindenburg Research)

More From Author

8th Pay Commission

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

Anjali Damania

Anjali Damania : वाल्मिक कराड दिल्लीत Amit Shah यांना भेटला; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत