Guardian Minister List : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वात संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे. गडचिरोलीत बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे.
Guardian Minister List : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर महायुती सरकराने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, ज्या जिल्ह्याची राज्यभर चर्चा सुरू आहे, त्या बीडच्या (Beed) पालकमंत्रिपदी अजित पवारांची (Ajit Pawar) वर्णी लागली आहे. बीडसोबतच, पवारांकडे पुण्याची जबाबदारी असेल. महत्वाचे म्हणजे, धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) पालकमंत्रिपदाच्या यादीतूनच वगळ्यात आले आहे. त्यांच्याकडे कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील सर्वात संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे. गडचिरोलीत (Gadchiroli) बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मुंबई शहर (Mumbai City) आणि ठाण्याचे (Thane) पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) जालन्याच्या (Jalana) पालकमंत्री असतील, तर संजय शिरसाटांकडे (Sanjay Shirsat) छत्रपती संभाजीनगरची (Chhatrapati Sambhajinagar) जबाबदारी देण्यात आली आहे. (Guardian Minister List)

दोन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये दोन पालकमंत्री करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ ऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना ही जबाबदारी दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमचे पालकत्व दिले आहे. मुंबई उपनगरची जबाबदारी आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात स्पर्धा होती. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे.
धनंजय मुंडेंना धक्का

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. आता मात्र त्यांचे नाव या यादीमधून वगळण्यात आले आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते, पण आता त्यांच्याकडे कुठल्याच जिल्ह्याची जबाबदारी नसेल. (Guardian Minister List)
पाहा पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सिंधुदुर्ग- नितेश राणे
अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम – हसन मुश्रीफ
सांगली – चंद्रकांत पाटील

सातारा -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
जळगाव – गुलाबराव पाटील
यवतमाळ – संजय राठोड
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
अकोला – आकाश फुंडकर
भंडारा – संजय सावकारे
बुलढाणा – मकरंद जाधव
चंद्रपूर – अशोक ऊईके
धाराशीव – प्रताप सरनाईक
धुळे – जयकुमार रावल
गोंदिया – बाबासाहेब पाटील
हिंगोली – नरहरी झिरवळ
लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर – एकनाथ शिंदे
(Guardian Minister List)
मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
नांदेड – अतुल सावे
नंदुरबार – माणिकराव कोकाटे
नाशिक – गिरीष महाजन
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – अदिती तटकरे

सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
जालना – पंकजा मुंडे
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी Team India ची घोषणा; कुणाला संधी, कुणाला डच्चू? पाहा…
(Guardian Minister List)