GST Collection Latest News: जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसा येतो.
GST Collection : 2025 च्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारसाठी गुड न्यूज आली आहे. 2024 च्या अखेरच्या महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत लाखो करोड रुपये जीएमटीच्या माध्यमातून जमा झाले आहेत. आज सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन 7.3 टक्क्यांनी वाढून 1.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
गेल्यावर्षी याच महिन्यात, म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये 1.65 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. याच महिन्यात घरगुती व्यवहारातील जीएसटी कर 8.4 टक्क्यांनी वाढला असून, 1.32 लाख कोटींवर पोहोचला आहे. आयातीवरील जीएसटी 4 टक्क्यांनी वाढला असून, 44268 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. GST Collection
डिसेंबरमध्ये 22490 कोटी रुपये परतावाही जारी करण्यात आला आहे. ही रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत 31 टक्के जास्त आहे. तर, नोव्हेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन 8.5 टक्के वार्षिक वाढीसह 1.82 लाख कोटी रुपये राहिले. आतापर्यंतचे सर्वात जास्त जीएसटी संकलन एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी झाले होते. GST Collection
अमेरिकेत भीषण अपघात; नववर्ष साजरा करणाऱ्यांना ट्रकने चिरडले, 12 ठार अन् 30 जखमी…