Google Map : पोलिसांना चोर समजून स्थानिकांनी रात्रभर ओलिस ठेवले.
Google Map : गेल्या काही काळापासून Google Map ने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे अपघात किंवा एखादं कुटुंब भलत्याच ठिकाणी पोहल्याची घटना घडली आहे. गुगल मॅपने चुकीचे रस्ते दाखविल्याने बिहारमध्ये काही लोकांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशाच अनेक घटना आहेत. यामुळे गुगल मॅपवर पूर्णपणे विसंबून राहण्यात काही अर्थ नाही.
असाच अनुभव आसाममध्ये छापा मारण्यासाठी जात असलेल्या पोलिसांना आला आहे. या गुगल मॅपमुळे आसाम पोलिस मोठ्या अडचणीत आले. पुढे त्यांच्यासोबत जे घडले ते देखील गंमतीशीर असले तरी तेवढेच गंभीरही आहे. मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे आसाम पोलीस थेट नागालँडला पोहोचले. तिथे स्थानिकांनी चोर समजून रात्रभर पोलिसांना ओलीस ठेवले. यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला अन् स्वतःची सुटका करुन घेतली.त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? जाणून घ्या… Google Map
आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील पोलीस आरोपीला पकडण्यासाठी छापा टाकत होते. पोलिसांची एक टीम साध्या वेशात आसाममध्ये छापा मारण्यासाठी जात होती. या टीममध्ये एकूण 16 पोलिस होते, त्यापैकी फक्त 3 पोलिस गणवेशात होते, तर बाकीचे सिव्हिल ड्रेस घातलेले होते. त्यांनी लोकेशन लावले, पण त्यांना गुगल मॅपने थेट नागालँडला पोहोचवले. तेथील लोकांनी त्यांना अत्याधुनिक शस्त्रांसोबत पाहिले आणि हे दरोडेखोर किंवा दहशतवादी असतील असे समजून त्यांच्यावर हल्ला करत कोंडून ठेवले. Google Map
पोलिसांच्या पथकाकडे अनेक आधुनिक शस्त्रेही होती. रात्रीच्या अंधारात ते नागालँडला पोहोचले, तेव्हा काही स्थानिकांना त्यांच्यावर संशय आला. शस्त्रे पाहून त्यांनी पोलिसांना चोर-दरोडेखोर समजून पकडले. स्थानिकांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमीही झाला. अखेर स्थानिकांनी त्यांना पकडले अन् रात्रभर ओलीस ठेवले. अडचणीत सापडलेल्या पोलिसांनी नागालँडच्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती दिली. यानंतर स्थानिक प्रशासनाने आणखी एक पोलिस पथक घटनास्थळी पाठवले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येऊन लोकांना समजावून सांगितल्यावरच त्यांनी आसाम पोलिसांच्या पथकाला सोडून दिले.
मी मनुष्यच आहे, देव नाही; माझ्याकडूनही चुका होतात, पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींचे मुक्त संभाषण