FDI in Maharashtra

FDI in Maharashtra: परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपयांची आकडेवारी CM देवेंद्र फडणवीसांनी दिली

FDI in Maharashtra : सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला असताना कर्नाटक दुसऱ्या, गुजरात तिसऱ्या, दिल्ली चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.

FDI in Maharashtra : राज्यातील उद्योगधंदे परराज्यात जात असल्यावरून महाराष्ट्र सरकारवर सातत्याने टीका होत असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली आहे. सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या 95 टक्के जमा झाली आहे.

अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.FDI in Maharashtra

महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या 95 टक्के एफडीआय अवघ्या 6 महिन्यांत झाली आहे. पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.

money, coin, investment

आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. FDI in Maharashtra

गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 119556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 95 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो… माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो.
FDI in Maharashtra

Open briefcase filled with stacks of hundred dollar bills on a glass table, representing wealth.

PM मोदी अजमेर शरीफला चादर पाठवणार; हिंदू संघटनांनी घेतला आक्षेप

More From Author

Ajmer Sharif dargah

Ajmer Sharif dargah: PM मोदी अजमेर शरीफला चादर पाठवणार; हिंदू संघटनांनी घेतला आक्षेप

Santosh Deshmukh Incident

Santosh Deshmukh Incident: वाल्मिक कराड अडचणीत, सहकाऱ्याने पोलिसांसमोर कबूल केला 5 गुन्हे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत