saif ali khan

Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला; चाकूचे 6 वार, लीलावती रुग्णालयात दाखल

Saif Ali Khan Attack : चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्याने सैफ अली खानवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात घुसून अभिनेत्यावर एकापाठोपाठ सहा वार केले. सैफला सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्लेखोर सैफ अली खानच्या घरी चोरीच्या इराद्याने आला होता आणि यादरम्यान त्याला घरातील मोलकरणीने अडवण्याचा प्रयत्न केला. प्रथम चोराचे मोलकरणीसोबत भांडण झाले, ज्याचा आवाज ऐकून सैफ त्याच्या खोलीतून बाहेर आला. दरम्यान, हल्लेखोराने सैफवर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि चालकाने सैफला रुग्णालयात नेले. (Saif Ali Khan Attack)

सैफला कुठे दुखापत झाली ?
सैफ अली खानच्या शरीरावर 6 वार करण्यात आले आहेत. त्याच्या मानेवर 10 सेमी लांबीची जखम आहे. तसेच, हातावर, पाठीवर आणि कंबरेवर चाकूचा वार झाला आहे. सैफ अली खानवर वार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चाकूचा भाग तुटून पाठीच्या कण्यामध्ये घुसला. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे तो काढला आहे. डॉक्टरांवर विश्वास ठेवला तर सैफ अली खानला या दुखापतीमुळे पक्षाघात झाला असता.

संशयिताने इमारतीत उडी मारली
पोलिस सूत्रांनी सांगितले की, संशयिताने बाजूच्या इमारतीतून सैफ अली खानच्या इमारतीत उडी मारली होती. संशयित दुसऱ्या इमारतीच्या कंपाउंडमधून सैफच्या इमारतीत आल्याचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले. (Saif Ali Khan Attack)

सैफ अली खानची तब्येत कशी आहे?
सैफ अली खानची प्रकृती आता चांगली आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास सुरू आहे. सैफच्या घरी पोलिस आणि फॉरेन्सिक टीम हजर झाली आहे.

डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट

हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले होते. यामध्ये सैफला शरीरावर सहा ठिकाणी जखमा झाल्या होत्या. यातील दोन जखमा गंभीर होत्या, दोन ठिकाणी किरकोळ दुखापत झाली होती तर दोन जागी खरचटलं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर त्याच्या शरीरातून सुमारे अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. सध्या अभिनेत्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं आहे.  

काय म्हणाले डॉक्टर? 

रात्री 2 वाजताच्या सुमारास सैफ अली खान यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चाकूच्या तुकड्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा तुकडा बाहेर काढण्यासाठी सर्जरी करावी लागली. त्यांच्या डाव्या हाताला दोन गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यांच्या मानेवरही जखम झाली होती. त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागली. 

करीना भेटायला आली
सैफ अली खान लीलावती रुग्णालयात दाखल आहे. तो आता धोक्याबाहेर आहे. सैफला भेटण्यासाठी त्याची पत्नी करीना कपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. (Saif Ali Khan Attack)

पोलिसांची 15 पथके तपासात गुंतली
सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी स्थानिक आणि गुन्हे शाखेच्या एकूण 15 टीम तयार केल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

पोलिसांनी एका आरोपीची ओळख पटवली
वांद्रे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. चोरीच्या उद्देशाने आरोपी घुसले होते. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. अटकेनंतर आम्ही तुम्हाला अधिक तपशील सांगू. (Saif Ali Khan Attack)

ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल ऐकून खूप काळजी वाटते. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते. मला खात्री आहे की, जबाबदार असतील त्यांना पकडले जाईल. या कठीण काळात माझे विचार आणि प्रार्थना शर्मिला दी, करीना कपूर आणि संपूर्ण कुटुंबासोबत आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर पोस्ट करत लिहिले की, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने मी हैराण झालो आहे. त्याला लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना धीर मिळो. (Saif Ali Khan Attack)

ज्युनियर एनटीआर सैफवरील हल्ल्याच्या बातमीने हैराण झाला
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे सगळेच तणावात आहेत. अभिनेता ज्युनियर एनटीआरने या प्रकरणावर पोस्ट करत लिहिले – सैफ सरांवर हल्ला झाला हे जाणून मला धक्का बसला आणि दुःख झाले. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.

पूजा भट्टने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्री पूजा भट्टने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पूजा भट्टने X वर लिहिले- या अराजकाला आळा घालता येईल का? वांद्रे येथे अधिक पोलिसांची उपस्थिती हवी आहे. मुंबई इतकी असुरक्षित वाटली नव्हती. कृपया लक्षात ठेवा. (Saif Ali Khan Attack)

राज्यभरात पुन्हा बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार; सरकारने बनवला कायदा…

More From Author

Pannu Murder

Pannu Murder : खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटाबद्दल केंद्राला मिळाला अहवाल

8th Pay Commission

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत