Devendra Fadnavis On Jalgaon Train Accident

Devendra Fadnavis On Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Devendra Fadnavis On Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

Devendra Fadnavis On Jalgaon Train Accident : जळगाव जिल्ह्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. पुष्पक एक्सप्रेस गाडीने अचानक ब्रेक मारल्याने चाकांमधून ठिणग्या उडाल्यानंतर आग लागल्याची अफवा पसरली. यामुळे रेल्वेतील प्रवासी खाली उतरले, त्यावेळी विरुद्ध बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडले. या घटनेत किमान 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखणी आहेत. दरम्यान या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी मृतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. Devendra Fadnavis On Jalgaon Train Accident

8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे फडणवीस त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले आहेत. Devendra Fadnavis On Jalgaon Train Accident

जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ झालेली आहे. यात निर्दोष लोकांचा जीव जात आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार योजना आणण्याच्या घोषणा करतात. कोणाचा जीव जाणार नाही, असे दावे करतात. कवच नावाची योजना आणणार असल्याचेही सांगितले जाते. परंतु, त्याचा किती उपयोग होत आहे, हे स्पष्ट आहे. कवच योजना ही जुमलेबाजी आहे. उलट आमच्या सरकारच्या कार्यकाळात रेल्वेची तिकिटे स्वस्त होती. आता मोदी सरकारच्या कार्यकाळात तिकीट दर तर वाढवण्यात आले आहेतच. पण लोकांचा जीवही जात आहे. हे प्रकार अजून किती होत राहणार, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. Devendra Fadnavis On Jalgaon Train Accident

माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो आहे. सद्यस्थितीत कार्यकर्त्यांच्या मदतीने मदतकार्य हाती घेतले आहे. मयत व जखमींच्या आकड्याविषयी अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनच जाहीर करणार आहे. -गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री

मुख्यमंत्र्यांसह मुख्य सचिव व केंद्रीय यंत्रणांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. पाचोरासह जळगावातील रुग्णालयात जखमींसाठी पुरेसे बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मदतकार्य सुरु आहे. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.

रेल्वे अपघातातील मयतांमध्ये 8 पुरुष, एक दहा वर्षीय बालक आणि तीन महिलांचा समावेश आहे.सर्वच मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले गेले आहेत. आतापर्यंत पाच मयतांची ओळख पटली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव, पाचोरा, भडगाव आणि भुसावळ तहसीलदार कार्यालयात नियंत्रण कक्ष तातडीने कार्यान्वीत करण्यात आले आहेत. जखमींसह मयतांच्या नातेवाईक, वैद्यकीय यंत्रणा आणि जखमींसाठी बेड उपलब्ध करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे आहेत. तर जीएमसीत दाखल होणाऱ्या जखमींवर उपचारासाठी मदतकार्याची सुत्रे अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.

बांग्लादेशी घुसखोरां शोधून बाहेर काढा, कारवाई करा; केंद्र सरकारच्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि डीजीपींना सूचना

Devendra Fadnavis On Jalgaon Train Accident

More From Author

Bangladeshi Intruders in Maharashtra

Bangladeshi Intruders : बांग्लादेशी घुसखोरां शोधून बाहेर काढा, कारवाई करा; केंद्र सरकारच्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि डीजीपींना सूचना

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत