Delhi Election 2025

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान अन् 8 ला निकाल

Delhi Election 2025 : भारतीय जनता पक्ष आणि आपमध्ये प्रमुख लढत आहे.

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळीही दिल्लीची निवडणूक एकाच टप्प्यात पूर्ण होणार आहे. विधानसभेच्या सर्व 70 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून देशाच्या राजधानीत प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. भाजप, आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत दिल्ली निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला त्याचा निकाल लागणार असल्याचे सांगतिले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, आजकाल प्रत्येक निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मतदारांमध्ये मिस मॅच झाले, मतमोजणी मंदावली, ईव्हीएम हॅक केले, अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात. Delhi Election 2025

जगात कुठेही मतदान संपल्यानंतर 6 वाजता लगेचच मतदानाची टक्केवारी दिली जात नाही. 5 वाजल्यानंतर पीठासीन अधिकारी मतदारांना ठिकठिकाणी टोकन देतात. मग शेवटचे मतदान झाल्यानंतर ते पॅक केले जाते. फॉर्म 17 सी भरला जातो. त्याची संख्या लाखात आहे. या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर अंतिम आकडा जारी केला जातो, अशी महत्वाची माहिती राजीव कुमार यांनी यावेळी दिली.

पोलिंग एजंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रातच असतात. ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतात. सर्व काही त्यांच्या समोर घडते. मतदान संपण्यापूर्वी, मतदान केंद्र सोडण्यापूर्वी फॉर्म 17 सी भरला जातो, ज्यामध्ये मतांची संख्या नोंदवली जाते. सेक्टर मॅजिस्ट्रेट दिवसभरात वेगवेगळ्या वेळी मतदान केंद्राला भेट देतात आणि मतदानाची नोंद घेतात ट्रेंड समजून घेण्याचा प्रयत्न करतात. 2020 पासून एकूण 30 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. 15 राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले. हेच मूळात लोकशाहीचे सौंदर्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले. Delhi Election 2025

भारतासाठी Good News! Microsoft चे CEO सत्या नडेला करणार 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

More From Author

Satya Nadella Met PM Modi

Satya Nadella Met PM Modi : भारतासाठी Good News! Microsoft चे CEO सत्या नडेला करणार 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Devendra

Devendra Fadnavis : आठवड्यातून तीन दिवस मंत्रालयात थांबा, मुख्यमंत्र्यांचा सर्व मंत्र्यांना आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत