Chhatrapati Sambhajinagar Shocking Crime

Chhatrapati Sambhajinagar Shocking Crime : पोलिसांचा धाकच उरला नाही; छ. संभाजीनगरात पोलिसावर कुख्यात गुंडाचा सुऱ्याने हल्ला

Chhatrapati Sambhajinagar Shocking Crime : आरोपीला बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करून यथेच्छ पाहुणचारही करण्यात आला.

Chhatrapati Sambhajinagar Shocking Crime : छत्रपती संभाजीनगरच्या गुडांमध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही. सध्या एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. जटवाटा रोडवरील सईद कॉलनी येथे असलेल्या एका सराईत मोबाईल चोराला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक पोहोचले होते. यावेळी ‘आज तुमको खत्म कर देता’, असे म्हणत कुख्यात गुन्हेगार शेख वाहेद शेख मोहसीन याने गुन्हे शाखेच्या पथकावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी हा वार चुकवला. मात्र, यात त्याने कडकडून चावा घेतल्याने एक अंमलदार जखमी झाला.

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस अंमलदार विजय रामराव भानुसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ हे पथकासह फरार गुन्हेगार व अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यासाठी शहरात गस्त घालत होते. वाघ यांचे पथक उद्धवराव पाटील चौकात असतांना, शेख वाहेद या सराईत मोबाइल चोराकडे चोरीचा मोबाइल आहे, अशी माहिती मिळाली. या माहितीवरुन वाघ व त्यांच्या पथकाने शेख वाहेद याचा शोध सुरू केला असता, शेख वाहेद हा जटवाडा रोडवरील अल्फा रुग्णालयाजवळ असल्याची माहिती त्यांना मिळाली. (Chhatrapati Sambhajinagar Crime)

या माहिती आधारे गुन्हे शाखेचे पथक शेख वाहेद याला पकडण्यासाठी गेले. शेख वाहेद याला पकडण्यासाठी पथक त्याच्या समोर आले असता शेख वाहेद याने पोलिसांवर सुरा उगारुन अश्लील शिवीगाळ केली. तसेच आज तुमको खत्म कर देता असे म्हणत हवालदार विजय निकम यांच्यावर प्राण घातक हल्ला चढविला. निकम यांनी शेख वाहेद याच्या कमरेला पाठीमागून पकडले असता, त्याने निकम यांच्या हाताच्या दंडाला चावा घेत जखमी केले. पथकातील इतर सदस्यांनी शेख वाहेद या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता शेख वाहेद याने त्यांच्याशी देखील झटापट केली.

अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत शेख वाहेद याला ताब्यात घेतले. शेख वाहेद याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक मोबाइल मिळाला. हा मोबाइल शेख वाहेद याने कांचनवाडी येथील दुकानाचे एक शटर उचकटून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्या ताब्यातून एक सुराही जप्त करण्यात आला आहे. प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहायक निरीक्षक शेषराव खटाने करीत आहेत. वाहेदककडून 30 सेमी लांब व ३ सेमी रुंदीच्या पात्याचा धारदार चाकू जप्त केला आहे.

आरोपीला बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करून यथेच्छ पाहुणचारही करण्यात आला. सहायक निरीक्षक शेषराव खटाणे तपास करत आहेत. त्याच्यावर आतापर्यंत लूटमार, दरोडा, हत्येचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ल्याचे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ क्रूर गुन्हेगार असून, सध्या हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हवालदार विजय निकम, मनोहर गिते, कृष्णा गायके, विजय भानुसे आणि ज्ञानेश्वर पवार आदींनी केली. (Chhatrapati Sambhajinagar Crime)

अमेरिकेत TikTok ची वापसी; शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 17 कोटी युजर्सना दिलासा

More From Author

Trump on TikTok

Trump on TikTok : अमेरिकेत TikTok ची वापसी; शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, 17 कोटी युजर्सना दिलासा

Public Provident Fund

Public Provident Fund : पत्नीच्या नावाने उघडा PPF खाते, दरमहा मिळेल 1 लाखाहून अधिक उत्पन्न! जाणून घ्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत