Narendra Modi Cabinet Decision : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
Narendra Modi Cabinet Decision : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. आज केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खताच्या पिशवीवर अतिरिक्त सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारीत पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत सुरु ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 69515 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. शिवाय, 50 किलोच्या डीएपीच्या बॅगेवर अतिरिक्त सबसिडी देण्यात आली आहे. ही खताची बॅग यापुढेही शेतकऱ्यांना 1350 रुपयांनाच मिळत राहणार आहे. Narendra Modi Cabinet Decision
आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमतीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी 3850 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी ही कॅबिनेट बैठक शेतकऱ्यांसाठी घेतली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी व्यापक चर्चा झाली आहे. यामुळे हे निर्णय त्यांच्या भल्यासाठी घेण्यात आल्याचे वैष्णव म्हणाले. Narendra Modi Cabinet Decision
आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी मस्साजोगच्या नागरिकांचे जलसमाधी आंदोलन
सौजन्य-एबीपी, टीव्ही९