Bike Taxi in Maharashtra : सामान्यांना या बाईक टॅक्सीचा फायदाच होणार आहे.
Bike Taxi in Maharashtra : गेल्या काही काळापासून बाईक टॅक्सी सेवा चर्चेत आली आहे. मुंबई-पुण्यात बाईक टॅक्सीसेवा सुरू झाली होती. परंतू, हे बेकायदेशीर असल्याने व आपला रोजगार बुडत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला होता. यामुळे परिवाहन विभागाने यावर कारवाई करत या कंपन्यांच्या दुचाकी टॅक्सी सेवा बंद केली होती. ती पुन्हा सुरू होणार आहे. राज्य सरकारने ओला, उबर प्रमाणेच बाईक टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी मसुदा तयार केला आहे.
महाराष्ट्र अॅग्रीगेटर रेग्युलेशन 2024 असे या मसुद्याचे नाव असून मोटर वाहन विभागाने हा मसुदा मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मांडला. परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याला दुजोरा दिला आहे. ही नियमावली प्रवाशांच्या सुरक्षेला प्राथमिकता देऊन तयार केल्याचे ते म्हणाले. हा एक नीतिगत निर्णय आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दोन महिन्यांत तो लागू केला जाणार आहे, असे ते म्हणाले. Bike Taxi in Maharashtra
अॅप आधारित चारचाकी किंवा दुचाकी टॅक्सी बोलविल्यानंतर ती 10 मिनिटांत आली नाही, तर चालकाला 100 रुपये दंड आकारला जाणार आहे. तो दंड प्रवाशाला दिला जाणार आहे. तसेच एयरपोर्ट, रेलवे स्टेशन आणि हॉस्पिटलसाठी केलेले बुकिंग रद्द केल्यास टॅक्सी चालकाला पाचपट रक्कम दंड आकारला जाणार आहे, असे यात आहे. Bike Taxi in Maharashtra
धनंजय मुंडे टोळीचा म्होरक्या, मुख्यमंत्री साहेब याला थांबवा; मनोज जरांगेंचा हल्लाबोल