Arvind Kejriwal

Arvind Kejriwal : मी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार, अमित शहांनी…केजरीवालांचे आव्हान

Arvind Kejriwal Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल जोरदार प्रचार करत आहेत.

Arvind Kejriwal Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आक्रमकपणे प्रचार करत आहेत. आज(दि.12) त्यांनी शकूरबस्ती झोपडपट्टीचा दौरा केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका केली. निवडणुका जवळ आल्यावर त्यांचे झोपडपट्टीवासीयांवरील प्रेम वाढते. त्यांना झोपडपट्टीवासीयांवर प्रेम नाही, तर त्यांची मते आणि जमिनीवर प्रेम आहे, अशी टीका त्यांनी केली.

केजरीवाल पुढे म्हणाले की, अमित शाहांनी पुढील 24 तासांत झोपडपट्टीवासीयांवर दाखल झालेले सर्व खटले मागे घ्यावेत. मग, मी आगामी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतो. काल शाहांनी झोपडपट्टीवासीयांना बोलावून मला शिवीगाळ केली होती. गृहमंत्र्यांनी एका मर्यादेत राहावे. त्यांनी जपून शब्द वापरायला पाहिजेत. अमित शाहांनी झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय. हे उघड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. (Arvind Kejriwal Delhi Election 2025)

जिथे झोपडपट्ट्या, तिथे घरे, असं अमित शाह म्हणाले. पण, जिथे झोपडपट्ट्या, तिथे त्यांच्या मित्रांची आणि बिल्डरांची घरे, हे त्यांनी सांगितले नाही. त्यांचा मित्र कोण आहे, हे सर्व जगाला माहीतेय. त्यांना झोपडपट्टीची जमीन त्यांच्या मित्रांना द्यायची आहे. ते सांगत आहेत की, मोदी घरे बांधतील, पण 10 वर्षात 4 लाख झोपडपट्टीवासीयांसाठी फक्त 4700 घरे बांधली. यांच्या हातात सत्ता गेल्यावर हे लोक ही झोपडपट्ट्या उद्धवस्त करतील, अशी टीकाही केजरीवालांनी यावेळी केली.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर दिल्लीतील झोपडपट्टीवासीयांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. ते शकूरबस्तीच्या झोपडपट्टीत गेले आणि म्हणाले की, 27 डिसेंबर रोजी दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरने या जमिनीचा वापर बदलला. ते म्हणाले की, भाजपचे नेते झोपडपट्टीत येऊन तुमच्यासोबत कॅरम खेळत आहेत आणि 8 फेब्रुवारीला निवडणुका संपल्याबरोबर हे लोक तुमच्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करतील. दोन दिवसही थांबणार नाही. (Arvind Kejriwal Delhi Election 2025)

अरविंद केजरीवाल म्हणाले की, 2015 मध्येही भाजपने रात्री 2 वाजता झोपडपट्ट्या पाडल्या होत्या. ते म्हणाले, मी तेव्हा मुख्यमंत्री झालो होतो आणि मध्यरात्री सर्व अधिकाऱ्यांना बोलावून या झोपड्या वाचवल्या. मी नसतो तर या झोपडपट्ट्या पाडल्या असत्या. त्यादिवशी भाजपच्या लोकांनी बुलडोझर आणला होता आणि तिथे गोंधळ माजला होता, त्यात एका सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. भाजपच्या लोकांना झोपडपट्टीवासीयांवर प्रेम नाही, त्यांना कोणाचीही पर्वा नाही. झोपडपट्टीवासीयांना ते किडे मानतात. त्याला फक्त आपल्या मित्रांसाठी जमिनीची काळजी आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री म्हणाले, देव आपल्याला साथ देत आहे, कारण आपण सत्याच्या मार्गावर चालत आहोत. ही कागदपत्रे आमच्याकडे आली आणि आम्हाला झोपडपट्टीची माहिती मिळाली, हे लोक दिल्लीतील प्रत्येक झोपडपट्टीचे नियोजन करत आहेत. दिल्लीतील सर्व झोपडपट्ट्या एका वर्षात पाडू. तुम्ही भाजपला मत दिल्यास तुमच्या आत्महत्येच्या वॉरंटवर सही केली जाईल. कोणती झोपडपट्टी कोणाला द्यायची याचे सर्व नियोजन भाजपने ठरवले आहे.

भाजपवर आरोप करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, त्यांनी तुघलकाबाद, नवी दिल्ली, मेहरौली, प्रगती मैदान, आनंद बिहार येथील संपूर्ण झोपड्या पाडल्या. दिल्लीतील अनेक झोपडपट्ट्या मी वाचवल्या, पण तीन लाख लोक आहेत ज्यांना मी वाचवू शकलो नाही. आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच आहे. आज मी अमित शहांना आव्हान देत आहे, काल तुम्ही झोपडपट्टीवासीयांना घरे देणार असल्याचे सांगितले होते. 10 वर्षात किती झोपडपट्टीवासी सुधारलेत? असेही केजरीवाल म्हणाले. (Arvind Kejriwal Delhi Election 2025)

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने स्वत:चा QR कोड लावून 58 लाख लुटले, गुन्हा दाखल

More From Author

QR Code Scam

QR Code Scam : पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने स्वत:चा QR कोड लावून 58 लाख लुटले, गुन्हा दाखल

Delhi Election 2025

Delhi Election 2025 : दिल्लीत काँग्रेसची नवी घोषणा, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 8500 रुपये मिळणार

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत