Anjali Damania

Anjali Damania : वाल्मिक कराड दिल्लीत Amit Shah यांना भेटला; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

Anjali Damania on Walmik Karad : अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Anjali Damania on Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेला वाल्मिक कराड एसआयटीच्या कस्टडीत आहे. त्याला 22 जानेपर्यंत कस्टडी मिळाली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून रोज केला जात आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मोठा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांची साथ आहे. धनंजय मुंडे यांना अजित पवार यांची साथ आहे, ते लॉबिंग करून आधी छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांना भेटतात. त्यानंतर दिल्लीला जातात. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतात, असा खुलासा दमानिया यांनी केला आहे.

धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या
संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी हे दोन वेगळे गुन्हे नाहीतर एकच गुन्हे आहेत. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अपहरण 28 मे ला झाले होते. त्यावेळेला मकोका का लावला नाही? सातपुडा बंगल्यामध्ये खंडणीची रक्कम निश्चित झाली होती. हा सातपुडा बंगला कोणाचा? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, या सर्व गोष्टींमध्ये धनंजय मुंडे यांचा रोल मोठा आहे. त्यामुळे पहिला राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला पाहिजे. (Anjali Damania on Walmik Karad)

धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर नसते तर गुन्हेगारी करण्याची वाल्मिक कराड याची हिंमत झाली नसती. एखाद्या सरपंचाला कोणी येऊन मारून जाईल? त्यानंतर राजकीय वरदहस्तामुळे त्यांना न्याय मिळणार नाही का? यामध्ये कुठले राजकारण अन् कुठली लोकशाही? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याला घेऊन दहशत निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील काहींच्या अंगठ्याला शाई लावून मतदानाचा हक्क बजावण्यास दिला नाही. त्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दमानिया यांनी म्हटले.

14 FIR असलेल्या व्यक्तीला, दोन शासकीय अंगरक्षक मिळवून देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे. (आपल्या कष्टाच्या कराच्या पैशातून एका गुन्हेगाराचे संरक्षण ? ) 15 तारखेला SP ना सांगून अंगरक्षक recall करवून, वाल्मिक कराड ला पळून जाण्याची संधी उपलब्ध अरुण देणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे. खून, जीवे मारण्याची धमकी, खंडणी असे 50 च्या वर सेक्शन्स असलेल्या माणसाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे परळीचे अध्यक्ष करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड ला पदोपदी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे.

संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी या दोन वेगवेगळ्या केस बनवण्यासाठी राजकीय दबाव आणणारे मंत्री धनंजय मुंडे आहेत. तपास न होऊ देणे, कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांची SIT बनवणे, सगळं सगळं करुन चुकणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे आहेत. ह्या धनंजय मुंडेंचा जोपर्यंत राजीनामा होणार नाही, तो पर्यंत लढत राहिला हवं, असं दमानिया म्हणाल्या. (Anjali Damania on Walmik Karad)

वाल्मिक कराडचं सीम अमेरिकेत रजिस्टर?
वाल्मिक कराड याच्याकडून जप्त करण्यात आलेलं सीम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराडकडच्या मोबाईल जप्तीनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात याच सीममधून अनेक फोन झाल्याचा एसआयटीला संशय आहे. (Anjali Damania on Walmik Karad)

दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. आका जो आहे तो सोपा आका नाही. या आकाकडे 17 मोबाईल होते. तुम्ही आता नाविन्यपूर्ण योजना सांगितली की, तो अमेरिकेहून धमकी देत होता. तो अमेरिकेचे सीम वापरत असेल. तो ते वापरत असेल. आका काय-काय नाही करु शकत? आकाचा बाका 50-50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता, असा धक्कादायक दावा सुरेश धस यांनी केला.

गौतम अदानींवर आरोप करणारी ‘Hindenburg’ कंपनी बंद; मालकाने केली घोषणा

हे बघा मी त्या माऊलीबद्दल काय बोललो का? महिला आहे. ती माझी भगिनी आहे. माझ्या भगिनी केलेल्या आरोपांवर मी काही बोलणार नाही. कोणताही पुरुष असेल त्याने माझ्यावर आरोप करावेत. व्हिडीओ, हे आणि ते, अरे कुठेच काही सापडू शकत नाही. लै धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलो आहे. माझे काही व्हिडीओ सापडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी मंजिली कराड यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिली. तसेच “एखाद्या पुरुषाने आरोप केले तर त्याला उत्तर देईन. आका आला तरी त्याला उत्तर देईन, असंही सुरेश धस म्हणाले. (Anjali Damania on Walmik Karad)

समाजाचे कार्यकर्ते वगैरे नाही. सोशल मीडियावर रिल्सवर जे पोरं आहेत, ज्यांचा ऑलरेडी या लोकांमुळे वाटोळं होऊन बसलेलं आहे, या पोरांनी पुस्तकं हाती घ्यायचा ऐवजी, अभ्यास हाती घ्यायच्या ऐवजी, नको त्या लोकांचे रिल्स बघत बसले आहेत. ते रिल्स बघण्याचा एक नवी अॅटम तयार झालेला आहे. त्यातील हे पोरं आहेत, बाकी काही नाही, अशी टीका सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या समर्थकांवर केली. (Anjali Damania on Walmik Karad)

खंडणीमुळे संतोष देशमुख यांची हत्या

खंडणीला आडवा आला म्हणूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. हे मी नाही सांगत तर एसआयटी सांगत आहे. आम्ही राजकारणी काहीही बोलू, पण एसआयटी खरं बोलेल ना? एसआयटीच्या रिमांड अर्जात हेच म्हटलं आहे की, खंडणीच्या आडवा आला म्हणून संतोष देशमुखला संपवलं, असं सुरेश धस म्हणाले.

सौजन्य-झी२४ तास, एबीपी माझा, मुंबईतक

(Anjali Damania on Walmik Karad)

More From Author

Hindenburg Research

Hindenburg Research : गौतम अदानींवर आरोप करणारी ‘Hindenburg’ कंपनी बंद; मालकाने केली घोषणा

Reliance Result

Reliance Result : मुकेश अंबानींसाठी खुशखबर; तिसऱ्या तिमाहीत Reliance ची 18,540 कोटी रुपयांची कमाई

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत