Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निधनाबद्दल एक व्यक्तीने फेक पोस्ट केली होती.
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निधनाची खोटी बातमी पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बुधवारी उत्तर प्रदेशमध्ये गाझियाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्याचे भाजपचे पदाधिकारी अनिल शर्मा यांनी या फेक न्यूजबद्दलची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिल शर्मा यांनी फेसबुकवर अमित शहांच्या निधनाची खोटी पोस्ट बघितली. (Amit Shah Death Fake News)
भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये आरोपी रोहित विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांनी दिली. लिसांनी आरोपी रोहितला अटक करून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबूली देताना असे करण्याचे कारणही सांगितले.
सोशल मीडियावरील फॉलोअर्स वाढवण्यासाठी अमित शहांबद्दलची फेक न्यूज पोस्ट केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले. पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, इंदिरापुरम पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीचे ठिकाण शोधले आणि त्यानंतर वसुंधरा कॉलनीमधील हिंडन नदीच्या पुलाजवळ त्याला अटक केली.
(Amit Shah Death Fake News)
