Ajmer Sharif dargah

Ajmer Sharif dargah: PM मोदी अजमेर शरीफला चादर पाठवणार; हिंदू संघटनांनी घेतला आक्षेप

Ajmer Sharif dargah: ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 813व्या उर्सानिमित्त पीएम नरेंद्र मोदी चादर पाठवत आहेत.

Ajmer Sharif dargah: पंतप्रधान नरेंद्र मोदीअजमेर शरीफ दर्ग्यासाठी चादर पाठवणार आहेत. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या 813व्या उर्सानिमित्त केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधी म्हणून दर्ग्यावर चादर चढवण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान, पीएम मोदींनी दर्ग्यावर चादर चढवण्यावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून देशात अजमेर शरीफ दर्गा चर्चेत आहे. काही हिंदू संघटनांनी या दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 जानेवारी रोजी अजमेर शरीफ दर्ग्यात चादर अर्पण करण्यात येणार आहे. दर्ग्याचे सेवक अफसान चिश्ती यांनी सांगितले की, पीएम मोदी दरवर्षी गरीब ख्वाजा नवाजच्या दर्ग्यावर चादर अर्पण करतात. संभल प्रकरणानंतर अजमेर शरीफ दर्ग्यावरही जोरदार राजकारण सुरू आहे.

काही हिंदू संघटनांनी अजमेर शरीफ दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा केला आहे. अशातच, पंतप्रधान मोदी 11व्यांदा तिथे चढण्यासाठी चादर पाठवत आहेत. त्यामुळेच आता हिंदू संघटनांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध सुरू झाला आहे. Ajmer Sharif dargah

हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी म्हटले की, चादर पाठवण्यास आपला आक्षेप नाही, मात्र घटनात्मक पदावरील व्यक्तीने चादर पाठवली, तर त्याचा थेट परिणाम केसवर होईल. त्यामुळेच विष्णू गुप्ता यांनी पत्र पाठवून परिस्थिती निवळत नाही, तोपर्यंत चादर न पाठवण्याची विनंती केली आहे. विष्णू गुप्ता पुढे म्हणतात की, जोपर्यंत अयोध्या प्रकरण कोर्टात सुरू होते, तोपर्यंत पीएम मोदी रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले नव्हते. त्यामुळे आताही त्यांनी प्रकरण कोर्टात असेपर्यंत चादर पाठवू नये.Ajmer Sharif dargah

मनू भाकर, डी गुकेशसह 4 खेळाडूंना Honored खेलरत्न जाहीर, 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

More From Author

shah

Amit Shah On Pok: काश्मीरचे नाव बदलणार? गृहमंत्री अमित शहांचे मोठे वक्तव्य, पाहा…

FDI in Maharashtra

FDI in Maharashtra: परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपयांची आकडेवारी CM देवेंद्र फडणवीसांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत