Ajit Pawar On Dhananjay Munde : संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
Ajit Pawar On Dhananjay Munde : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. आता अखेर या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मौन सोडत स्पष्टपणे भाष्य केले.अजित पवारांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले.
कोणाचीही गय करण्याचे कारण नाही
तीन एजन्सी या प्रकरणाची चौकशी करतात. जो कोणी दोषी असेल. ते सिद्ध झालं तर कारवाई होईल. चौकशी सुरु आहे. आरोपी सापडायला वेळ लागला. महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पुरावा नसताना कोणावर आरोप करणं कितपत योग्य आहे. कोणत्याही चौकशीत जर एखाद्यावर आरोप झाला तर आज एसआयटीची चौकशी सुरु आहे. आज सीआयडीची चौकशी सुरु आहे. न्यायलयीन चौकशी सुरु आहे. Ajit Pawar On Dhananjay Munde
आता या तीन वेगवेगळ्या एजन्सी तिथे चौकशी करत आहेत. त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलेले आहे की या चौकशीदरम्यान जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते सिद्ध झाले तर त्यांच्यावर ताबडतोब चौकशी होईल. या संदर्भात मी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. यात कोणताही पक्ष वैगरे न बघता, जर कोणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे व्यक्ती यात दोषी असतील, तर कोणाचीही गय करण्याचे कारण नाही, असेही मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यांनी मी त्या देखील प्रकारचा आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे चौकशी सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.
बडी मुन्नी कोण?
सुरेश धस यांनी या प्रकरणावर बोलताना बडी मुन्नीचा उल्लेख केला होता. त्यानंतर ही बडी मुन्नी नेमकी कोण आहे यावर चर्चा सुरू झाली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. हे त्यांनाच विचारा, ते जर असल्या फालतू गोष्टी बोलत असतील तर मी आता नाव घेऊन बोलणार आहे. अशाप्रकारच्या घटना महाराष्ट्रात आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. ही निर्घृण हत्या झाली आहे. यात तितक्याच गांभीर्याने सरकारने लक्ष दिले आहे. अर्थात समोरच्या विरोधी पक्षातील नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींना काय बोलायचं याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण असं करत असताना कोणावरही अन्याय होऊ नये, ही पण खबरदारी घ्यावी लागते. यात राजकारण आणून देणार नाही आणि कोणालाही पाठीशीही घालणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. Ajit Pawar On Dhananjay Munde
7 खासदार तुमच्या पक्षात येणार का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 7 खासदारांना आपल्या पक्षात सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या खासदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या आरोपांवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनीच माध्यमांसमोर येऊन तसं काही झालं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे हे आरोप खोटे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
छत्तीसगडच्या सुकमा आणि बीजापूरमध्ये मोठी कारवाई; चकमकीत 3 नक्षलवादी ठार
Ajit Pawar On Dhananjay Munde