Airplane Crash

Airplane Crash : दक्षिण कोरियात भीषण विमान अपघात, 179 प्रवाशांचा मृत्यू; लँडिंग करताच उडाला आगीचा भडका

Airplane Crash in South Korea : आज सकाळी 9 वाजता दक्षिण कोरियात ही धक्कादायक घटना घडली.

Airplane Crash in South Korea : दक्षिण कोरियामध्ये आज, रविवारी एक मोठा विमान अपघात झाला. दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान धावपट्टीवरून घसरले. अपघातावेळी विमानात 181 प्रवासी होते, ज्यातील 179 जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने इतर दोघांना वाचवण्यात यश आले.

स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 वाजता हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, हे बोइंग 737 विमान बँकॉकवरुन दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेऊन येत होते. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगदरम्यान हे विमान कोसळले. मृतांमध्ये सहा क्रु मेंबर्सचाही समावेश आहे. सोशल मीडियावर या अपघाताचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. (Airplane Crash in South Korea)

पक्षाच्या थव्याची धडक
स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, विमानाने पक्ष्यांच्या थव्याने धडक दिल्यामुळे त्याचे लँडिंग गियर खराब झाले. लँडिंग गिअर निकामी झाल्यानंतर पायलटने थेट विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचा वेग कमी करता आला नाही आणि विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाउंड्री वॉलले धडकले.

विमान धडकताच त्याचा मोठा स्फोट झाला अन् सर्वत्र आग पसरली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रवाशांना जीव वाचवण्यासाठीच काहीच करता आले नाही. अपघातावेळी विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. प्रवाशांपैकी 173 दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत, तर इतर 2 थायलंडचे होते. सुदैवाने यातील दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. (Airplane Crash in South Korea)

कझाकस्तानमध्येही असाच अपघात झाला
गेल्या आठवड्यात बुधवारी(दि.25) कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ एम्ब्रेर पॅसेंजर जेट क्रॅश होऊन 38 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे विमान रशियातून आले होते. याला मॉस्कोने अलीकडेच युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण दिले होते. अझरबैजान एअरलाइन्सच्या फ्लाइट J2-8243 ने अझरबैजान ते रशियाच्या नियोजित मार्गावरून शेकडो मैल दूर उड्डाण केले आणि कॅस्पियन समुद्राच्या विरुद्ध किनाऱ्यावर क्रॅश झाले.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी रशियन हवाई क्षेत्रात झालेल्या विमान अपघाताबद्दल अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांची माफी मागितली. रशियन वृत्तसंस्थेने शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, रशियन हवाई क्षेत्रात ही दुःखद घटना घडल्याबद्दल व्लादिमीर पुतिन यांनी दु:ख व्यक्त केले आणि पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल तीव्र आणि प्रामाणिक शोक व्यक्त केला. विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.

सौजन्य-NDTV,Moneycontrol,NewYorkPost

(Airplane Crash in South Korea)

चीन ब्रह्मपुत्रा नदीवर बांधतोय जगातील सर्वात मोठे धरण; भारतावर वाईट परिणाम होण्याचा तज्ञांचा दावा

More From Author

china

China Dam: चीन ब्रह्मपुत्रा नदीवर बांधतोय जगातील सर्वात मोठे धरण; भारतावर वाईट परिणाम होण्याचा तज्ञांचा दावा

Sugar Side Effects

Sugar Side Effects : 14 दिवस साखर सोडल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या फायदे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत