Aditi Tatkare on Ladki Bahin Yojna : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojna : मागील काही महिन्यांपासून लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. आज अखेर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना खूशखबर दिली असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरीत करण्यास आपण सुरुवात केली आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून प्रतिमहिना 2100 रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. विधानसभेतील दणदणीत विजयानंतर सत्तेत पुनरागमन करणारी महायुती आता आपले आश्वासन कधी खरे करून दाखवणार, याबाबतची विचारणा होऊ लागली आहे. यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याबाबत पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो. दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्यात आली होती. या योजनेसाठी नव्याने नोंदणी करण्याची संधी मिळणार की नाही, याबाबत मात्र संभ्रम कायम आहे. Aditi Tatkare on Ladki Bahin Yojna

गेमचेंजर योजना
महिलांचे सशक्तीकरण व्हावे या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यास प्रारंभ झाला होता. राज्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे महिलांसाठी राज्यसरकाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. आतापर्यंत मागील महिन्यात महिलांना 7500 रुपये खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहितामुळे या योजनेचे अंमलबजावणी करता आली नाही. परंतु आता आचारसंहिता संपली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नवे मंत्रिमंडळ ही अस्तित्वात आलेले आहे तेव्हा डिसेंबरचा हप्ता कधी आणि किती रुपयांचा जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते.
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojna
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK सामना कुठे होणार, पाहा…
