Abdul Rahman Makki

Abdul Rahman Makki Death: 26/11 हल्ल्याचा आरोपी दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

Abdul Rahman Makki Death: पाकिस्तानात हर्ट अटॅखने मृत्यू झाल्याची माहिती.

Abdul Rahman Makki Death: भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये हर्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. मक्की हा लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज मोहम्मद सईदचा मेव्हुणा होता. विशेष म्हणजे, भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मक्कीचा थेट हात असायचा. मक्कीच्या मृत्यूमुळे लष्करला मोठा धक्का बसला आहे.

अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे. 2023 मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्याची सर्व संपत्तीही जप्त करण्यात आली होती. मक्की लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखेचे नेतृत्व करायचा. याशिवाय तो जमात-उद-दावाचा प्रमुखही होता. लष्कराच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी त्याने पार पाडली आहे. Abdul Rahman Makki Death

लष्कर-ए-तैयबाचे भारतात मोठे हल्ले
लाल किल्ल्यावर हल्ला: 22 डिसेंबर 2000 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 6 दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर घुसून सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन जवानांसह तीन जण ठार झाले होते.
रामपूर हल्ला: 1 जानेवारी 2008 रोजी 5 दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचे 7 जवान आणि एका रिक्षाचालकाला प्राण गमवावे लागले.

Abdul Rahman Makki Death


26/11: मुंबईत लष्कर-ए-तैयबाने सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. 10 दहशतवादी अरबी समुद्रामार्गे मुंबईत घुसले आणि त्यांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला होता.
श्रीनगर हल्ला: 12-13 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीनगरच्या करण नगरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये एक आत्मघाती हल्लेखोर घुसले. यावेळी एक जवान शहीद झाला, तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
बारामुल्ला: 30 मे 2018 रोजी बारामुल्लामध्ये लष्कराच्या दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली होती.

कोण होता Abdul Rehman Makki ?

लष्कर ए तैयबाचा संस्थापक Hafiz Saeed चा अब्दुल रहमान मक्की हा मेव्हणा होता. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. या हल्ल्यामध्ये 175 जणांचा जीव गेला होता तर 300 पेक्षा अधिक लोकं जखमी झाले होते. त्याला 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्याची संपत्ती फ्रीझ करण्यात आली होती, प्रवासी बंदी आणि शस्त्रास्त्रबंदी लागू करण्यात आली होती.

प्रक्षोभक वक्ता असलेला मक्की हा इस्लामाबादमधील फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या काश्मीर एकता दिनाच्या रॅलीमध्येही नियमित येत होता. मुंबई हल्ल्याच्या दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2010 मध्ये अशाच एका रॅलीत, मक्कीने काश्मीर पाकिस्तानला न दिल्यास भारतात “रक्ताच्या नद्या” वाहतील अशी धमकी देऊन गेला होता. बळजबरीने ते ताब्यात घेण्याची धमकीही त्याने दिली होती.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

More From Author

Suresh Dhas on Dhananjay Munde

Suresh Dhas on Dhananjay Munde : महादेव बेटिंग अॅप, एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटींचे व्यवहार; सुरेश धसांचे खळबळजनक आरोप

India-Bangladesh

India-Bangladesh: भारताविरुद्ध कारवाया रचतोय पाकिस्तान; बांग्लादेशात पाठवले 250 किलो RDX आणि 100 AK47

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत