AAP on Congress : आपलने काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
AAP on Congress : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला उतरती कळा लागल्याचे पाहायला मिळत आहे. एक-एक करत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. यामुळेच आता इंडिया आघाडीत वादाच्या ठिणग्या पडल्याचे चित्र आहे. अशातच, दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणाऱ्या आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसलाच इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याच्या हालचाली आपने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील राजकारणाचा पारा वाढला आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी आपचेअरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार केल्याने आप नाराज झाली आहे. काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आम आदमी पक्ष नाराज झाला असून, आता काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याची भूमिका घेतली आहे. AAP on Congress
भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत फक्त रु. 3.99 लाखांपासून सुरू
अरविंद केजरीवालांना देशविरोधी म्हणत, ते अस्तित्वात नसलेल्या योजनांवरून लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. काँग्रेसने अशा पद्धतीने हल्ला चढवल्याने आम आदमी पक्षाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते अजय माकन आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांच्यावर हल्ला चढवला.
मुख्यमंत्री आतिश यांच्यासोबत घेतलेल्या परिषदेत खासदार सिंह म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना देशविरोधी म्हणणाऱ्या अजय माकन यांच्यावर काँग्रेसने २४ तासात कारवाई करावी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेस सर्व काही करत आहे. काँग्रेसचे अजय माकन हे भाजपची स्क्रिप्ट वाचत आहेत. काँग्रेसने अजय माकन यांच्याविरोधात कारवाई केली नाही, तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून काढून टाकावे, अशी मागणी आम आदमी पार्टी आघाडीतील घटक पक्षाकडे करणार आहे, असे खासदार सिंह
AAP on Congress