Do something that the next ten generations will honor :पुढच्या दहा पिढ्या आपले नाव आदराने घेतील असे काम करा – डुकरी पिंपरी निरोप समारंभात विद्यार्थ्यांसह शिक्षकही गहिवरले
Do something that the next ten generations will honor जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत आमची शाळा आणि दहावीचा वर्ग म्हणजे एक कुटुंब..हे कुटुंब सोडून जाताना खुप यातना होत आहेत…दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ वेळी भारावलेल्या प्रतिक्रिया सन २०२४_२०२५ या शैक्षणिक वर्ष इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मा.सी.जी.वाघमारे.व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना आमची शाळा म्हणजे आमचं कुटुंब असून हे कुटुंब सोडुन जाताना मनाला खुप यातना होत आहेत विद्यालयातील शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणाच्या शिदोरीमुळे आयुष्यात निश्चित यशस्वी होऊ अशी प्रेरणा मिळालेली आहे..

(Do something that the next ten generations will honor) याच बळावर विद्यालयाचा नावलौकिक दूरवर नेवू अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या..तसेच शाळेचे सर्व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ते बोलतांना म्हणाले की,विद्यार्थ्यांनी निर्भय वातावराणात प्रामणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवावे असेही ते म्हणाले तसेच शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमांचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन केले ते बोलताना म्हणाले की विद्यार्थीं मिञांनो शिक्षण घेतांना आपल्याला पुढे काय करायचे यांचा विचार करून एक गोल ठरवा आणि त्या दिशेने वाटचाला करा.यश तुमच्या हातात येईल.

जिवनात असे काही काम करा की तुमच्या पुढच्या दहा पिढ्या तुमचे आदराने नाव घेतील तर आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.आपण नैसर्गिक कल ओळखून आपल्या आवडीच्या क्षेञात करिअर करा.
कोणत्याही क्षेञात जा पण ते नामांकित व्हा आणि आपल्या राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी शाळेचे नाव मोठे करा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मा.सी.जी.वाघमारे.यांनी केले.यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती एस.आर कुलकर्णी, वाय.बी.मदन, डी.एन.सोनकांबळे, पी.पी.नागरे. श्रीमती.ए.बी.देशपांडे, एल.बी.जाधव, आर.एस.ठाकरे, एस.बी.राऊत,एम.ए.खरात आदीची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सुञसंचालन व आभारप्रदर्शन इयत्ता दहावीची विद्यार्थ्यींनी कु.पायल रोहिदास राठोड ह्या विद्यार्थ्यींनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली..!
