Walmik Karad : वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.
Walmik Karad : संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
सुटून जायचे किंवा इतर सर्व षडयंत्र झाले असतील तर आता परत जेलमध्ये जावं, डॉक्टर नक्की कोणत्या तपासण्या करत आहेत, काय ऑपरेशन सुरू आहे? सुटून जायचं ऑपरेशन सुरू आहे का? पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांमध्ये नेमकं काय सुरू आहे? आरोग्य मंत्र्यांनी या विषयात लक्ष घालण्याची गरज आहे. Walmik Karad
आता तो पळून जात नसतो, पोलीस त्याला पाय धरून अपटतील. ती कोणत्या पोलिसाची रेकॉर्डिंग व्हायरल झाली, त्याचा सगळा सिडीआर तपासला गेला पाहिजे. डॉक्ट तुम्ही जर काही चुकीचे पाऊलं उचलली तर तुमची पण चौकशी होणार असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.Walmik Karad
पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉक्टर पण गोत्यात येतील, दुखत नसताना का ठेऊन घेतलं आहे. कोण भेटायला येतंय का तिथे, पुढच्या मागच्या दाराने कोण फोनवर बोलतंय का? आरोपींना आयसीयूमध्ये सांभाळायचं की जेलमध्ये ठेवायचं? आरोग्यमंत्री साहेब तुमच्या डॉक्टरांना विचारा नक्की त्याचं दुखतंय काय ? आरोग्यमंत्री यावर लक्ष ठेवा, कारण यात खूप शंका येत आहे. त्या रेकॉर्डिंग आलेल्या पीआयला तिथून बाजूला काढा आणि त्याची तपासणी करा. आंधळे, मुंडे, गित्ते यांना न्याय मिळाला पाहिजे.
ज्या महादेव भय्या मुंडे यांची क्रूर हत्या केली, तुमच्याच समाजातल्या लेकी बाळीच कुंकू पुसलं गेलं आहे. त्याचे तीन चार लेकरं दिसत होते, कसं चालवायचं कुटुंब त्या माउलीने, आरोपी जातीचे असले म्हणून काय झालं. मुंडे असो आंधळे असो की गित्ते त्यांच्या कुटुंबानं आवाज दिल्यास त्यांच्या न्यायासाठी पाठीशी उभे राहणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.Walmik Karad
आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार; उद्धव ठाकरेंची घोषणा…