Bangladeshi Intruders in Maharashtra : केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्रातील बांग्लादेशी घुसखोरांबाबत कडक कारवाईला सुरुवात केली आहे.
Bangladeshi Intruders in Maharashtra : बांग्लादेशी घुसखोरांबाबत केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. बांग्लादेशी घुसखोरांवर कडक कारवाई करण्याच्या लेखी सूचना केंद्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील गृह विभागाला पत्र दिले आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी अवैध बांग्लादेशी घुसखोरांविरोधात आलेल्या रिपोर्टचा हवाला देत गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिले होते. शेवाळे यांनी टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्स च्या अहवालावरून बांग्लादेशी घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता. मुंबई पोलिसांनी 30 वर्षीय बांग्लादेशी घुसखोर शरीफुल इस्लाम याला सैफवरील हल्ल्याप्रकरणी अटक केली. त्यामुळे बांग्लादेशी घुसखोरीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्सने बांगलादेशी घुसखोरांवर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक रिपोर्ट जारी केला होता. त्या रिपोर्टनुसार, बांगलादेश आणि म्यानमारहून बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करणाऱ्यांमुळे मुंबईत सामाजिक आर्थिक गंभीर परिणाम होत आहेत असं म्हटलं होते. (Bangladeshi Intruders in Maharashtra)
केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि इतर संबंधित यंत्रणांना बांग्लादेश आणि म्यानमारमधून महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध स्थलांतरितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेना उपनेते आणि माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या बांग्लादेशी घुसखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयाने हे निर्देश दिले आहेत. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी बांग्लादेशी घुसखोर असल्याने आता बांग्लादेशी घुसखोरांविरुद्धची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Bangladeshi Intruders in Maharashtra)
बेकायदेशीर बांग्लादेशी शोधण्यासाठी सर्वेक्षण
महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी सांगितले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या बेकायदेशीर बांग्लादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी जिल्हा, नागरी संस्था आणि पोलिसांच्या मदतीने सर्वेक्षण केले जाईल. शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ज्या बांग्लादेशींनी बेकायदेशीरपणे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र व इतर कागदपत्रे मिळविली आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पुढील आठवड्यात पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासोबत बैठक होईल आणि अशा (बांग्लादेशी) लोकांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. (Bangladeshi Intruders in Maharashtra)
ठाण्यातील कामगार छावणीत अवैध बांग्लादेशी
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी दावा केला की, वैध कागदपत्रांशिवाय बांग्लादेशी नागरिक ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये राहत आहेत, तेथून अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कावेसर कामगार छावणीत शोधमोहीम राबविण्याची विनंती माजी खासदारांनी ठाणे पोलीस आयुक्तांना केली. (Bangladeshi Intruders in Maharashtra)
त्यांनी ‘X’ वर लिहिले, मी 12 मजुरांना भेटलो आणि त्यापैकी नऊ बांग्लादेशी मुस्लिम होते. पश्चिम बंगालमधील मालदा येथील आहे, परंतु त्याच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नाहीत. मुंबई पोलिसांनी रविवारी सांगितले की, त्यांनी बांग्लादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर याला 16 जानेवारीच्या रात्री त्याच्या अपार्टमेंटमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी ठाण्याच्या जंगल परिसरात असलेल्या कामगार छावणीत सापडला होता, जिथे त्याला अटक करण्यात आली. (Bangladeshi Intruders in Maharashtra)
या अवैध बांग्लादेशींमुळे शहरातील मजुरांना रोजगार मिळत नाहीत. मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्यामुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे. 1961 साली मुंबईत हिंदूंची लोकसंख्या 88 टक्के होती, जी 2021 साली 66 टक्के झाली. मुस्लीम लोकसंख्या 8 टक्क्यांवरून 21 टक्के इतकी झाली. घुसखोरांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांवर दबाव येत आहे. आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या सुविधेवर ताण पडून स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
या घुसखोरांमधील काही दहशतवादी संघटनांशी जोडले असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे यांची नावे निवडणूक यादीत टाकली जातात ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करत याच्याशी निगडीत सर्व समस्यांना मुळापासून उपटून काढण्याचे आदेश दिले आहेत. (Bangladeshi Intruders in Maharashtra)
जळगावात भीषण रेल्वे अपघात; कर्नाटक एक्सप्रेसने चिरडल्याने 10-15 प्रवाशांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी