Jalgaon Train Accident

Jalgaon Train Accident : जळगावात भीषण रेल्वे अपघात; कर्नाटक एक्सप्रेसने चिरडल्याने 10-15 प्रवाशांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

Jalgaon Train Accident : आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवासी खाली उतरले, दुसऱ्या दिशेने येणाऱ्या ट्रेनने चिरडले.

Jalgaon Train Accident : जळगावच्या परंडा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाला आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली. यादरम्यान, पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने अनेक प्रवाशांना चिरडले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील परांड्याजवळ साखळी ओढून ट्रेन थांबवण्यात आली. यानंतर काही प्रवासी रुळावर उतरले.

यावेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना चिरडले. या घटनेत किमान 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20-30 जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगावपासून 20 किलोमीटर अंतरावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. (Jalgaon Train Accident)

अपघात कसा झाला?
परंडा रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेस येत होती. ट्रेनच्या मोटरमनने ब्रेक लावला आणि चाकांमधून आगीच्या ठिणग्या निघू लागल्या. त्यामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली. त्यामुळे महिला व मुलांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. घाबरलेल्या लोकांनी डब्यातून उड्या मारायला सुरुवात केली. त्यांची संख्या 35 ते 40 असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरी ट्रेनही येत असल्याचे या प्रवाशांना दिसले नाही. त्यामुळे बेंगळुरू एक्स्प्रेसची धडक बसून अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्रवासी काय म्हणाले?
ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, हा अपघात दुपारी 3.30 ते 4 च्या दरम्यान झाला. आग लागल्याची अफवा पसरली होती. यानंतर काही लोकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. दरम्यान, समोरून बेंगळुरू एक्स्प्रेस येत होती, त्यात 30 ते 35 जणांना चिरडले. अनेक जण जखमी झाले आहेत. काहींचा मृत्यू झाला आहे, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे की, समोरून येणाऱ्या बेंगळुरू एक्स्प्रेसने हॉर्नही वाजवला नाही. हॉर्न दिला असता तर प्रवाशांना सावध केले असते. (Jalgaon Train Accident)

गुलाबराव पाटील काय म्हणाले?
परधाडे गावाजवळ ही घटना घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की आग लागल्याच्या अफवेने लोकांनी उड्या मारल्या. 15 ते 20 मिनिटात प्रांत अधिकारी आणि कलेक्टर घटनास्थळी पोहचत आहेत. घटनास्थळी पोहचायला जळगावहून 30 ते 40 मिनिटे लागतात. पण जोपर्यंत इथे कोणी जाणार नाही तोपर्यंत हे लक्षात येणार नाही, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी टीव्हा9 शी बोलताना दिली.

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती देताना सांगितले की, मध्य रेल्वेच्या कंट्रोल रुमकडून माहिती देण्यात आली की, कर्नाटक एक्सप्रेसबरोबर एक अपघाताची घटना घडली, ज्यामध्ये 7 ते 8 लोक जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून आपण तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या.

प्रांत अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस अधिकारी देखील पोहचले आहेत.रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील दुर्घटनेनंतर मदतकार्य करत आहेत. ते एबीपी माझाशी बोलताना दिली. ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय या तीन रुग्णालयाकडून मदत घेतली जात आहे. त्यामध्ये सर्व रुग्णांना मदत केली जात आहे असेही प्रसाद म्हणाले. (Jalgaon Train Accident)

आधी सरकारी कर्मचारी, आता शेतकऱ्यांची चांदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

More From Author

Modi Cabinet Decision

Modi Cabinet Decision: आधी सरकारी कर्मचारी, आता शेतकऱ्यांची चांदी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Bangladeshi Intruders in Maharashtra

Bangladeshi Intruders : बांग्लादेशी घुसखोरां शोधून बाहेर काढा, कारवाई करा; केंद्र सरकारच्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि डीजीपींना सूचना

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत