Petrol-Diesel Price

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मोठी माहिती

Petrol-Diesel Price : भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Petrol-Diesel Price : भारतात पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही तसे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनानंतर अमेरिका पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवेल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा अधिक होऊन भाव नियंत्रणात येतील.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील नवीन प्रशासनाच्या तेल आणि वायूचे उत्पादन जास्तीत जास्त करण्याच्या योजना लक्षात घेता, जास्त प्रमाणात अमेरिकन तेल भारतात येण्याची शक्यता आहे. भारताला तेल पुरवठादारांची संख्या आधीच 27 वरून 39 पर्यंत वाढली आहे आणि जर आणखी तेल आले, तर भारत त्याचे स्वागत करेल. तेल आणि वायू उत्पादन वाढवण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाच्या पावलांबद्दल विचारले असता पुरी म्हणाले की, जर तुम्ही मला विचाराल की, जास्तीचे अमेरिकन इंधन बाजारात येणार आहे का, तर माझे उत्तर होय आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात इंधनाची अधिक खरेदी होण्याची दाट शक्यता आहे. Petrol-Diesel Price

पुरी पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या नवीन प्रशासनाच्या घोषणांवर भारत सरकार अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. ट्रम्प प्रशासनाने घेतलेले काही निर्णय अपेक्षित होते आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी प्रतीक्षा करण्याची गरज आहे. पुरी यांनी 2015 च्या पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याच्या अमेरिकन सरकारच्या निर्णयावर भाष्य करण्यास नकार दिला. पेट्रोलियम मंत्र्यांनी अमेरिका, ब्राझील, गयाना, सुरीनाम आणि कॅनडा येथून अधिक तेलाची आवक झाल्याचा उल्लेख केला आणि किंमती कमी होण्याचे संकेतही दिले. Petrol-Diesel Price

त्यांनी वाहन उत्पादकांना भारतीय बाजारपेठेत उच्च इथेनॉल मिश्रण असलेल्या फ्लेक्स इंधन वाहनांची उपलब्धता वाढवण्यास सांगितले. यासोबतच पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, देश लवकरच 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठणार आहे, जे निर्धारित वेळेच्या पाच वर्षे आधी असेल. अधिकाधिक अमेरिकन तेल बाजारात आले तर आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन आणि आखाती देशांचे तेल स्वस्त होईल. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील आणि देशात महागाईही नियंत्रणात राहील. Petrol-Diesel Price

तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ झाली होती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन तेलाची आवक झाल्यामुळे किमतीत लक्षणीय घट झाली होती. आताही असेच काही घडण्याची शक्यता आहे. याचा फायदा भारतासारख्या देशांना होईल, जे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त तेल आयात करतात. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकन क्रूड ऑइल WTI 2.25 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $76.13 वर व्यापार करत आहे. तर आखाती देशांच्या ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत 1.17 टक्क्यांनी घसरण होत असून किंमत प्रति बॅरल $79.21 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांच्या मते ट्रम्प प्रशासन सक्रिय झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण होईल.

ड्रोन, 5 फोर्स, 10 पथके; 1 कोटींचे बक्षीस अललेला कुख्यात नक्षलवादी चलपती अखेर ठार

Petrol-Diesel Price

More From Author

Naxal Chalapati Encounter

Naxal Chalapati Encounter : ड्रोन, 5 फोर्स, 10 पथके; 1 कोटींचे बक्षीस अललेला कुख्यात नक्षलवादी चलपती अखेर ठार

UPSC Exam 2025

UPSC Exam 2025 : UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 ची अधिसूचना जारी, 979 जागांवर भरती; जाणून घ्या पात्रता निकष…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत