Devendra Fadnavis in Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या दौऱ्यावर आहेत. दावोसमधून महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे.
Devendra Fadnavis in Davos : सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या दौऱ्यावर आहेत. दावोसमधून महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पहिला सामंजस्य करार झाला आहे. कल्याणी समूहाकडून गडचिरोलीमध्ये पोलाद उद्योगासाठी 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
कल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये संरक्षण, स्टील आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलाद उद्योगासाठी 5 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे. त्यामाध्यमातून 4 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केला आहे. (Devendra Fadnavis in Davos)
उदय सामंत काय म्हणाले ?
दावोस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सोबतच येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते फुटणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारणार आहेत असा दावा देखील यावेळी उदय सामंत यांनी केला आहे.
आज पुन्हा एकदा दावोसमधून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना आनंद होत आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्रासामधील गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. मला सांगताना आनंद वाटतो की, आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक आणण्यात यश मिळाले आहे. उद्या देखील अशाप्रकारची गुंतवणूक आणण्यात यश मिळेल. विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, त्याला आज सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्यावर टाकलेला विश्वास महायुतीच सरकार म्हणून आम्ही सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही उदय सामंत यांनी म्हटले. (Devendra Fadnavis in Davos)
अशी परिषद मुंबईत आयोजित होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांची भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक आहेत. येणार्या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी त्यांनी यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबत सुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून फडणवीसांचे कौतुक
या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र मंडळाच्या एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्यावेळी एका चिमुकल्याने देवेंद्र फडणवीस यांना खास भेट देऊन कौतुक केले. सध्या या चिमुकल्यासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकला असा म्हणताना दिसतोय.
माननीय देवेंद्र फडणवीस काका, माझ्याकडून तुम्हाला एक छोटंसे गिफ्ट, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं तुम्ही म्हणाला होतात, आणि तुम्ही खरंच पुन्हा आलात, हे मला खूप छान वाटतंय. असंच तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहा, आता मी तुमचे स्वित्झर्लंडमध्ये स्वागत करणार आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी…, अशा मराठी अभिमान गीताच्या काही ओळी ऐकवत चिमुकल्याने देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केले. (Devendra Fadnavis in Davos)
पत्नीच्या नावाने उघडा PPF खाते, दरमहा मिळेल 1 लाखाहून अधिक उत्पन्न! जाणून घ्या…