Eknath Shinde Shivsena : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. कारण नाशिकमधून शिवसेनेचे दादा भुसे तर रायगडमधून भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते.
Eknath Shinde Shivsena : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या (Shivsena) गोटात अस्वस्थता आहे. कारण नाशिकमधून शिवसेनेचे दादा भुसे (Dada Bhuse) तर रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र नाशिकमध्ये भाजपच्या गिरीश महाजन आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची चर्चा आहे.
खासकरुन रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील तणाव वाढला आहे. आदिती तटकरेंना पालकमंत्री पद जाहीर होताच रायगडमध्ये शिवसेना आमदार आणि समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातच काही संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले, महामार्ग रोखला. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाच्या मागणीची पाठराखण केली. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वादावर भाष्य केले आहे. (Eknath Shinde Shivsena)
पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्री दावोसला राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी गेलेत. मुख्यमंत्री आल्यानंतर पालकमंत्रिपदाबाबत चर्चा होईल. आम्ही सगळे सुसंस्कृत आहोत, विचाराच्या माध्यमातून वागणारे असल्याने राष्ट्रीय महामार्गावर उतरून रस्त्यावर टायर जाळणे ही आमची संस्कृती नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करू. उपमुख्यमंत्री अजित पवारही त्यांच्याशी बोलतील. एकनाथ शिंदेंशीही चर्चा करू, त्यातून जो काही निर्णय होईल त्यात सर्वजण समाधानी असतील.
मुख्यमंत्री दावोसला गेले असताना राज्यात अशाप्रकारे प्रश्न उद्भवणे योग्य नाही हे खरे आहे. परंतु राजकारणात काही वेळा काही गोष्टी घडत असतात. आम्ही सुसंस्कृत आहोत आणि विचारधारेशी बांधले गेलो आहोत. आम्हाला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाची दिशा दिली आहे. त्यामुळे जी काही चर्चा करायची ती निश्चितपणे होईल. इतरांनी कुठल्या गोष्टीचा अवलंब करावा यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असेही तटकरे म्हणाले. (Eknath Shinde Shivsena)
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
पालकमंत्रिपदाची अपेक्षा करण्यात वावगं काय आहे? भरत गोगावले यांनी अनेक वर्षे रायगडमध्ये काम केले आहे. अपेक्षा ठेवणे, मागणी करणे चुकीचे नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे आम्ही तिन्ही नेते बसून यावर मार्ग काढू, असे शिंदे म्हणाले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे. मात्र त्याचवेळी आमच्या मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची अपेक्षा करण्यात वावगे काही नसल्याचे सांगत नाराज नेत्यांना शिंदे यांनी बळ दिले आहे.
एकनाथ शिंदे दरे गावात
एकनाथ शिंदे हे अचानक दरे या त्यांच्या मूळ गावी पोहोचल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत बोलताना शिंदे यांनी म्हटले की, मी नाराज झाल्याच्या बातम्या चालवल्या जात आहे, पण तुम्हीच बघत आहेत की, मी तर काम करतोय. मी गावी आलो की लगेच तुम्ही म्हणता मी नाराज आहे. नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट आपण हाती घेतलाय. हा प्रोजेक्ट मोठा असल्याने मला वारंवार गावी यावे लागणार आहे. पर्यटनाचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख निर्माण होईल. यासाठी जे कष्ट घ्यायचे असतील ते इथला एक भूमिपुत्र म्हणून मी घेईल. (Eknath Shinde Shivsena)
तब्बल 64.80 ट्रिलियन डॉलर्स; ब्रिटिशांनी भारतातून 5 देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त संपत्ती लुटली