RG Kar Rape Murder

RG Kar Rape Murder Case: आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील ‘राक्षसाला’ला जन्मठेपेची शिक्षा; 162 दिवसांनंतर मिळाला न्याय…

RG Kar Rape Murder Case: पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

RG Kar Rape Murder Case: कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉय ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही, त्यामुळे ते दोषीला जन्मठेपेची शिक्षा देत आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला आहे. या कलमांतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे.

संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. यावर पीडितेच्या पालकांनी भरपाई घेण्यास नकार दिला. शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी संजय रॉय यांना सांगितले की, मी तुला आधीच सांगितले होते की, तुझ्यावरील बलात्कार आणि हत्येसारखे सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळेच तुला जन्मठेपेची शिक्षा होत आहे. (RG Kar Rape Murder Case)

संजय रॉय म्हणाला- मी गुन्हा केलेला नाही
संजय रॉय याने दावा केला की, जेव्हा सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घेतले, तेव्हा येथील रेल्वे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली, परंतु काहीही आढळले नाही. न्यायाधीशांनी त्याच्या कुटुंबाबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की, त्याला आई आहे, परंतु अटक केल्यानंतर कोणीही त्याला भेटायला आले नाही. अटकेपूर्वी तो पोलीस छावणीत राहत होता. तो म्हणाला की त्याने गुन्हा केला नाही.

सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, हे प्रकरण दुर्मिळ श्रेणीतील आहे. समाजातील लोकांचा विश्वास टिकवण्यासाठी संजय रॉयला जास्तीत जास्त शिक्षा द्यायला हवी. संजय रॉयच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, फिर्यादीने असे पुरावे सादर केले पाहिजेत, जे सिद्ध करू शकतील की, दोषीच्या सुधारणेची कोणतीही शक्यता नाही. तो म्हणाला की, तो फाशी सोडून इतर शिक्षेसाठी तयार आहे. (RG Kar Rape Murder Case)

सीबीआयच्या वकिलाने हा युक्तिवाद केला
सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलाने सांगितले की, आम्ही पुरावे सादर केले आहेत. आम्ही कायद्यानुसार काम केले आहे. पीडित 36 तास ड्युटीवर होती, तिच्यावर कामाच्या ठिकाणी बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. ती एक हुशार विद्यार्थिनी होती. पुराव्यांवरून त्या रात्री घडलेल्या घटनेबद्दल सर्व काही स्पष्ट होते. अनेक चर्चेनंतरही आरोपीचे निर्दोषत्व सिद्ध झालेले नाही.

कडक शिक्षा न झाल्यास समाजाचा विश्वास उडेल – सीबीआय
आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असल्याचे संजयने सांगितले. त्याचवेळी संजयचा गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. कडक शिक्षा झाली नाही तर समाजाचा विश्वास उडेल. हा काही किरकोळ गुन्हा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. (RG Kar Rape Murder Case)

त्या दिवशी काय झालं
महिला डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली. 9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमध्ये 31 वर्षीय महिला डॉक्टरवर क्रूरपणे हल्ला करण्यात आला. आधी तिच्यावर बलात्कार झाला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी सीबीआय कोर्टाने बंद खोलीत सुनावणी सुरू केली होती.

57 दिवसांनंतर सियालदह जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बन दास यांनी त्याला दोषी घोषित केले. या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याला दोषी घोषित करण्यात आल्याचे सियालदह न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटले आहे. कोर्टाने फॉरेन्सिक रिपोर्टवर विश्वास ठेवला. या अंतर्गत न्यायालयाने या प्रकरणात संजय रॉयला दोषी ठरवले. शनिवारी न्यायालयाने संजय रॉय यांना दोषी घोषित केले होते, तर आज शिक्षा सुनावली आहे. (RG Kar Rape Murder Case)

पीडितेच्या पालकांनी केलेली फाशीची मागणी
पीडितेच्या पालकांकडून उपस्थित राहिलेल्या वकिलानेही जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. संजय रॉय हा सिव्हिक व्हॉलंटियर असल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्याकडे होती. पण त्याने सुरक्षा करण्याऐवजी पीडितेसोबत जघन्य गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त(फाशी) झाली पाहिजे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. पण, न्यायालयाने सुनावणीअंती आरोपीला जन्मठेप सुनावली आहे. (RG Kar Rape Murder Case)

162 दिवसांनी निर्णय
2024 मध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेच्या सुमारे 162 दिवसांनंतर न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय दिला आणि संजय रॉय यांना दोषी ठरवले. या प्रकरणाची सुनावणी सुमारे 57 दिवस चालली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिस करत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने 13 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सीबीआयने 120 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुमारे दोन महिने या प्रकरणी कॅमेरा ट्रायल सुरू होती.

आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
संबंधित प्रकरणातील आरोपी संजय रॉयला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया रविवारी आरोपीच्या आईने दिली. मुलाला फाशीची शिक्षा झाली, तरी माझा त्याला आक्षेप नसेल. कारण त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मी एकट्याने रडेन, माझे नशीब समजून सर्व गोष्टींचा स्वीकार करेन. एक महिला व तीन मुलींची आई असल्याने मी त्या पीडितेच्या मातेचे दु:ख समजू शकते, असे नमूद करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. (RG Kar Rape Murder Case)

अक्षय शिंदेचा पोलिसांकडून फेक एन्काऊंटर; न्यायालयीन समितीची धक्कादायक रिपोर्ट

More From Author

Akshay Shinde Encounter

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा पोलिसांकडून फेक एन्काऊंटर; न्यायालयीन समितीची धक्कादायक रिपोर्ट

British in India

British in India : तब्बल 64.80 ट्रिलियन डॉलर्स; ब्रिटिशांनी भारतातून 5 देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त संपत्ती लुटली

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत