Akshay Shinde Encounter

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा पोलिसांकडून फेक एन्काऊंटर; न्यायालयीन समितीची धक्कादायक रिपोर्ट

Akshay Shinde Encounter : बदलापूर प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी फेक एन्काऊंटर केल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे.

Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील शाळेतील लहान लैंगिक मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदेचा चकमकी मृत्यू झाला. आता या चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयात धक्कादायक अहवाल सादर करण्यात आला आहे. आरोपी अक्षय शिंदेंचा एनकाउंटर बनावट असल्याचे समोर आले आहे. आरोपी अक्षय शिंदेला घेऊन जाणाऱ्या पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होते आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाच पोलिस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

काही महिन्यांपूर्वी बदलापुरातील एका शाळेतील तीन चिमुकलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला होता. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती. आरोपीने पोलिस पथकावर गोळीबार केला, ज्यात पोलिस अधिकारीही जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. पोलिसांचे पथक तळोजा कारागृहातून अक्षयला घेऊन जात असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Akshay Shinde Encounter)

अक्षय शिंदेसोबत झालेल्या झटापटीत पाच पोलिसांनी वापरलेला बळाचा वापर अनावश्यक होता आणि त्याच्या मृत्यूसाठी हे पाचही पोलीस जबाबदार आहेत. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, अक्षय शिंदेंने त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र मृताचे बंदुकीवर बोटांचे ठसे नाहीत. स्वसंरक्षणार्थ गोळीबार करणाऱ्या पोलिसांचा वैयक्तिक बचाव अवास्तव आणि संशयास्पद आहे, असे अहवालात म्हटले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने खुल्या न्यायालयात अहवाल वाचून दाखवला.

अक्षय शिंदेचे वकील काय म्हणाले?
अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर झाला असून, ही हत्या आहे, असा आरोप अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. आम्ही क्रिमिनल रिटपिटीशन दाखल केली होती. त्यात आम्ही हा फेक एन्काऊंटर असून मर्डर आहे, असा दावा केला होता. गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टाच्या निगराणीखाली तपास होण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने स्टँड घेतला की, जोपर्यंत कस्टोडियल डेटची एन्क्वायरी करणारे न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आम्ही पुढील स्टेप घेणार नाही, असा स्टँडच सरकारचा होता. आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो फायनल रिपोर्ट दिला, त्यात फेक एन्काऊंटर झाला असून, ही हत्याच आहे, असे अमित कटारनवरे यांनी म्हटले. (Akshay Shinde Encounter)

आता पुढचा काय निर्णय होतो याकडे आम्ही लक्ष ठेवून आहे. एफआयआर होतोय की नाही तात्काळ ते पाहणार आहोत. न्यायदंडाधिकाऱ्याचा रिपोर्ट असताना एफआयआर घेत नसतील तर आम्हाला जे पोलीस अधिकारी एफआयआर घेणार नसेल तर आम्ही पुढची स्टेप घेऊ. फिंगर प्रिट गनवर नाही. पोलिसांनी आरोप केला होता. पण अहवालात पोलिसांचा दावा खोटा ठरला. सेल्फ डिफेन्ससाठी एन्काऊंटर झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते, ते सिद्ध होत नाही. डिटेल रिपोर्ट हाती आला नाही. रिपोर्ट आल्यावर तपास करू. सरकार काय भूमिका घेतील हे पाहू, असेही अमित कटारनवरे यांनी सांगितले.

बदलापूरची जनता रस्त्यावर उतरलेली
बदलापूच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे मुख्य आरोपी होता. या घटनेनंतर बदलापूरकराच्या मनातील आक्रोश, संताप समोर आला होता. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली होती. अनेक तास रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. मागच्या वर्षीची ऑगस्ट महिन्यातील ही घटना आहे. लोकांचा संताप लक्षात घेऊन कोर्टाने स्वत:हून याचिका दाखल करुन घेत काही पावल उचलली होती. (Akshay Shinde Encounter)

अखेर बेंजामिन नेतन्याहू तयार झाले, 15 महिन्यांनंतर इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदी

More From Author

Israel Hamas Ceasefire

Israel Hamas Ceasefire: अखेर बेंजामिन नेतन्याहू तयार झाले, 15 महिन्यांनंतर इस्रायल-हमासमध्ये युद्धबंदी

RG Kar Rape Murder

RG Kar Rape Murder Case: आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील ‘राक्षसाला’ला जन्मठेपेची शिक्षा; 162 दिवसांनंतर मिळाला न्याय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत