Naxal Encounter

Naxal Encounter : विजापूरच्या घटनेचा 10 दिवसांत घेतला बदला, सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

Naxal Encounter : 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांच्या स्फोटात 8 जवान शहीद झाले होते.

Naxal Encounter : आज(16 जानेवारी 2025) सकाळपासून विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत 12 नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED स्फोटात आठ जवानांना वीरमरण आले होते. आता अवघ्या दहा दिवसांत सुरक्षा दलांनी या घटनेचा बदला घेतला आहे.

विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांकडून ही मोठी कारवाई सुरू आहे. सकाळपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात 12 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली आहेत. DRG विजापूर, DRG सुकमा, DRG दंतेवाडा, कोब्रा 204, 205, 206, 208, 210 आणि CARIPU 229 बटालियनचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे. Naxal Encounter

8 जवान शहीद
छत्तीसगडमधील विजापूर येथील कुत्रू जंगलात 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनाला भूसुरुंग लावून उडवले होते. या दुर्दैवी घटनेत 8 जवान शहीद झाले, तर एका चालकाचाही मृत्यू झाला होता. हे सर्व सैनिक अबुझमद भागात नक्षलविरोधी अभियान राबवून परतत होते. आता अखेर दहा दिवसांतच सुरक्षा दलांनी आपल्या साथीदारांच्या बलिदानाचा बदला घेतला आहे. Naxal Encounter

वाल्मिक कराड दिल्लीत Amit Shah यांना भेटला; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

More From Author

PM Svamitva Yojna

PM Svamitva Yojna: PM नरेंद्र मोदींची देशातील 65 लाख लोकांना मोठी भेट, मालमत्ता कार्डचे करणार वितरण…

Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे अनपेक्षित, अनाकलनीय!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत