IPL 2025 : BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या हंगामाबाबत मोठी माहिती दिली आहे.
IPL 2025 : क्रिकेटचा महाकुंभ इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 संदर्भात एक मोठे अपडेट समोर आली आहे. यावेळी हंगाम कोणत्या तारखेपासून सुरू होणार, हे उघड झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी (12 जानेवारी) ही माहिती दिली. आयपीएलच्या पुढच्या हंगामाचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत (एजीएम) घेण्यात आला होता. राजीव शुक्ला यांनी बैठकीनंतर तारीख जाहीर केली.
IPL 2025 ची तारीख जाहीर
आयपीएल 2025 चा हंगाम 23 मार्चपासून सुरू होणार आहे. या मोसमातील पहिला सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल, हे अद्याप सध्या निश्चित झालेले नाही. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजीव शुक्ला म्हणाले की, बैठकीत एकच मोठा मुद्दा होता, तो म्हणजे खजिनदार आणि सचिव निवडीचा. याशिवाय IPL कमिशनरची नियुक्तीही एका वर्षासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, येत्या 23 मार्चपासून आयपीएल 2025 सुरू होणार आहे. महिला प्रीमियर लीगची ठिकाणे देखील निश्चित करण्यात आली आहेत, जी लवकरच जाहीर केली जातील.
गेल्यावर्षी 22 मार्चला IPL सुरू झाले होते अन् पहिला सामना आरसीबी आणि सीएसके यांच्यात खेळला गेला होता. तर, 26 मे रोजी KKR आणि हैदराबाद संघांमध्ये अंतिम सामना झाला होता. केकेआर संघाने अंतिम फेरीत विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन बनले. यावेळी अंतिम सामना केकेआरच्या होम ग्राउंड ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो.
टीम इंडियाच्या निवडीबाबतही मोठे अपडेट
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. अलीकडेच बातम्या समोर आल्या होत्या की, बीसीसीआयने संघ निवडण्यासाठी आयसीसीकडे आणखी वेळ मागितला आहे. अशा परिस्थितीत राजीव शुक्ला यांनी संघाची निवड केव्हा होणार याबाबतही मोठा अपडेट दिला. राजीव शुक्ला यांनी सांगितले की, निवड समितीची बैठक 18 किंवा 19 जानेवारीला होणार आहे.
‘भारताला विकसित होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही’, पंतप्रधान मोदींना विश्वास