Dhananjay Munde Resignation – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांने अख्खं रान पेटवल आहे. याच पार्श्व भूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाव घेत आरोप केले आहेत. तसेच विरोधकांकडूनही धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. विरोधकांचं एक शिष्टमंडळ आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीस गेलं आहे. या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे धनंजय मुंडे यांच्याबाबत तक्रार करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

शिवाय या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्यावर देखील दबाव आणण्यात येत आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आणखी अनेक महत्त्वाच्या घडामोडी राजकीय वर्तुळात घडल्या आहेत.
मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुपारी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. शिवाय या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चासुद्धा झाली आहे. त्यांच्या चर्चेनंतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर माध्यमांशी संवाद साधन देखील टाळलं आहे. यानंतर आता अजित पवार धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार की नाही?याकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागून आहे.शिवाय या बाबतीत एक महत्त्वाची माहितीही समोर आली आहे.
Dhananjay Munde Resignation
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांच नेमक मत काय?

Dhananjay Munde Resignation
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जोपर्यंत Dhananjay Munde यांच्या विरोधात काही पुरावा सापडत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असं मत अजित पवार यांचं असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याद्वारे समोर येत आहे. शिवाय या प्रकरणात एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई होऊ नये असंही अजित पवार यांचं मत आहे. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही. तीनही चौकशींमध्ये जो दोषी असेल, त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार अशी अजित पवार यांची भूमिका असल्याची एका वृत्तवाहिनीद्वारे समजतय त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही, असे एकंदरित चित्र दिसत आहे.
Dhananjay Munde Resignation
उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांची भूमिका काय?
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर आज Dhananjay Munde यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. “नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज अजित पवार यांची भेट घेतली. पदभार स्विकारल्यानंतर माझ्या खात्यासंदर्भात दोन -तीन बैठका झाल्या असून काही निर्णय घेण्यात आले आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कोणी काय आरोप करावेत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे.
लोकशाहीने प्रत्येका नागरिकाला अधिकार दिला आहे. आपण काय प्रत्येकाचं तोंड धरू शकत नाही. ज्या पक्षातील नेत्यांकडून आरोप होत आहेत, त्या पक्षाच्या अध्यक्षांना हा प्रश्न विचारा. पोलीस यंत्रणा काम करत आहे. माझ्याकडे जेव्हा संशयानं पाहिलं जातं, तेव्हा या संदर्भात मी अधिक सांगण योग्य नाही. ज्या तपास यंत्रणांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचा तपास पूर्ण होऊ द्या, माध्यमांच ट्रायल सुरु आहे. पण ट्रायल कोर्टात होऊ द्या, तपास यंत्रणा काम करत आहेत”, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.
Dhananjay Munde Resignation

Dhananjay Munde