America Firing New Orleans : न्यू ऑरिलीन्सच्या कॅनल आणि बॉर्बन स्ट्रीटवर ही घटना घडली.
America Firing : अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे मोठी घटना घडली आहे. येथे नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले. यानंतर ट्रकमधून उतरलेल्या हल्लेखोरांनी गर्दीवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत.
एपी न्यूज एजन्सीनुसार, पोलिसांनी बुधवारी (1 जानेवारी 2025) सांगितले की, शहरातील प्रसिद्ध बोर्बन स्ट्रीट परिसरात एक ट्रक गर्दीत शिरली आणि तिथे अनेकांना चिरडले. यानंतर ट्रकमधून उतरलेल्या लोकांनी अचानक गोळीबार सुरू केला. (America Firing New Orleans)
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केल्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. न्यू ऑर्लीन्सच्या आपत्कालीन तयारी एजन्सीने या घटनेबद्दल आधीच इशारा दिला होता आणि लोकांना त्या भागापासून दूर राहण्यास सांगितले होते.
पोलिसांचे लोकांना आवाहन
सोशल मीडिया पोस्ट्सवरून ही घटना अतिशय भीषण असल्याचे दिसत आहे. घटनेनंतरचे अनेक व्हिडिओ फुटेज आणि फोटो समोर आली आहेत. यामध्ये चौकाचौकात पोलिसांची वाहने आणि रुग्णवाहिका उभ्या असल्याचे दिसून आले. अधिकारी या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. पोलिसांनी लोकांना सध्या या भागात जाणे टाळण्यास सांगितले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (America Firing New Orleans)
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; पहिल्याच कॅबिनेटमध्ये घेतले महत्वाचे निर्णय