Suresh Dhas on Dhananjay Munde : महादेव अॅपच्या माध्यमातून परळीतील लोकांनी अब्जावधी पैसे कमावले असून त्यांच्यामागे त्यांचा ‘आका’ आहे. बीडमधील कोणतंही प्रकरण घ्या, त्याच्यामागे एकच ‘आका’ आहे, असा आरोप त्यांनी केला.
Suresh Dhas on Dhananjay Munde : बीडच्या आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. त्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांवर जोरदार टीका केली. परळीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावरही तसेच ट्रान्सएक्शन झाले आहे. यावर कोणत्या यंत्रणेने तपास केला पाहिजे? परळीत दोन लोकांकडे मोठे घबाड आहे, अजून असे किती लोक असतील याची माहिती घेतली पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
जिल्ह्यातील सर्व घटनांमागे एकच आका
धस पुढे म्हणतात, आपल्या मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला. यामागे परळीचा ‘आका’ आहे. महादेव बेटिंग अॅप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल असा आरोपही त्यांनी केला. यासंबंधित सर्व कागदपत्रे ही पोलिस अधीक्षकांना दिले असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. महादेव अॅपच्या माध्यमातून परळीतील लोकांनी अब्जावधी पैसे कमावले असून त्यांच्यामागे त्यांचा ‘आका’ आहे. बीडमधील कोणतंही प्रकरण घ्या, त्याच्यामागे एकच ‘आका’ आहे, असा आरोप त्यांनी केला. Suresh Dhas on Dhananjay Munde
परळी म्हणजे गँग्ज ऑफ वासेपूर
1400 एकरच्या जवळपास गायरान जमीन शिरसाळा गावात आहे. आकाचे बगलबच्चे या ठिकाणी काम करतात. त्या ठिकाणच्या 600 विट भट्ट्यांपैकी 300 विटभट्ट्या या अवैध जागेवर आहेत. एका ठिकाणी 50 एकर जमीन घेतली. गरिबांच्या जमिनी लाटल्या. कुणाच्या नावावर किती जमीन आहे ते पाहा. देवीच्या मंदिरासाठी 8 एकर जागा होती, ती लाटली. बंजारा समाजाच्या लोकांची जागाही लाटली. त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले. हा ‘आका’ चा कोणता नवीन पॅटर्न आहे? बीडमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या प्रकरणांची आपल्याकडे कागदपत्रं असून त्याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
धनुभाऊ-प्राजक्ता माळी…
आम्ही परळीत बघतो, रश्मिका मंधाना, सपना चौधरी येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचे असेल, त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल, तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, असा खोचक टोला सुरेश धस यांनी लगावला. त्यांच्या या सर्व आरोपांवर धनंजय मुंडे काय बोलतात, हे पाहणे महत्वाचे आहे. Suresh Dhas on Dhananjay Munde
‘अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं’
‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करु, देशमुख यांना न्याय देऊ असं सांगितलं आहे. पण, अजूनही असं काही होत असल्याचे दिसत नाही. काही दिवस याचा तपास पोलिस करत होते, यानंतर सीआयडीकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला. पोलिस यंत्रणेला हे तिनही गुन्हे कुठेतरी लिंक असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले आहे. यामुळे या गुन्हाच्या पाठिमागचा कोण मास्टरमाइंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी केली. Suresh Dhas on Dhananjay Munde
कोण सीआयडीची मागणी तर कोण एसआयटीची मागणी करत आहे. पण मी पहिल्या दिवसापासून सीबीआयची मागणी करत आहे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या पाच वर्षापासून वेगळ्या ट्रॅकवर गेला आहे. याच्यात कोण आहे ते तपासले पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळत आहे. या गुन्ह्याच्या संदर्भात मी कोणाच नाव घेण्यापेक्षा लोकांना सर्व गोष्टी माहित आहेत. बीड जिल्ह्यात ज्या घटना घडल्या आहेत. त्या घटनेचा उहापोह झालेला नाही, दमानिया यांनीही व्हिडीओ शेअर केल्या आहेत. याचे तपास केले पाहिजेत. या गुन्हेगारांना कोण पाठबळ देत आहे त्याचा तपास केला पाहिजे. सीडीआर काढला तर याची सर्व माहिती मिळेल, असंही बजरंग सोनवणे म्हणाले.
सौजन्य-एबीपी माझा, न्यूज१८ .
CM देवेंद्र फडणवीस बीडचे पालकमंत्री होणार? दिले सूचक विधान; म्हणाले…
Suresh Dhas on Dhananjay Munde