Delhi Election 2024

Delhi Election 2024: आता गुलाल भाजपचाच; दिल्ली काबीज करण्यासाठी RSS ने आखली रणनीती…

Delhi Election 2024: दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी संघाने खास रणनिती आखली आहे.

Delhi Election 2024: पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षासह दिल्लीतील मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने दिल्लीत विजयी हॅटट्रिक करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहेत. त्यातही दिल्लीत तिरंगी लढत होत असल्याने इंडिया आघाडीत एकत्र असलेले काँग्रेस आमि आम आदमी पक्ष ही एकमेकांच्या आमने सामने आले आहेत.

दिल्लीमध्ये मागील 26 वर्षांपासून भाजपाला सत्ता स्थापन करता आलेली नाही. हा वनवास संपुष्टात आणण्याची तयारी संघाने केली आहे. 2014 पासून सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीत भाजपाला यश मिळाले, मात्र 2015 आणि 2020 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे या पराभवांची पुनरावृत्ती टाळण्याचे मोठे आव्हान यावेळी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर असणार आहे. (Delhi Election 2024)

भाजपाला दिल्लीतील सत्ता जिंकून देण्यासाठी संघही सज्ज झाला असून, दिल्ली जिंकून हरणाया आणि महाराष्ट्राची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंवसेवक संघाकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये 2 लाखांहून अधिक बैठका घेण्याच्या तयारीत आहे. तर 13 हजारांहून अधिक बुथवर घरोघरी जाऊन मतदारांना भाजपाला मत देण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. याआधी हरयाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हीच रणनीती आखली होती.

हरयाणामध्ये काँग्रेसची लाट असल्याचे दावे केले जात होते, तसेच काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात होते. एक्झिट पोलमध्येही काँग्रेसच्या विजयाचे भाकित करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हरयाणाचे निकाल धक्कादायक लागले. हरयाणामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ग्राऊंड लेव्हलवर मोठ्या प्रमाणात काम केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडनूक हा पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला होता. अशा परिस्थितीत संघाने सूत्रे हाती घेऊन हिंदूंना जातपात, प्रांत, भाषा, मतभेद विसरून मतदान करण्याचे आवाहान केले होते.

अमित शहांच्या निधनाची खोटी बातमी, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

(Delhi Election 2024)

More From Author

Satish Wagh Case

Satish Wagh Case: धक्कादायक! मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध; मोहिनी वाघने दिली पतीच्या हत्येची सुपारी…

Manmohan Singh Passes Away

Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत