Santosh Deshmukh Case

Santosh Deshmukh Case : मुख्य आरोपी अजूनही मोकाट, पोलिसांच्या तपासावर खासदार बजरंग सोनवणे संतापले…

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 16 दिवस उलटून गेले आहेत, तरीदेखील या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.

Santosh Deshmukh Case : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 16 दिवस उलटूनही मुख्य आरोपी फरार असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठी मागणी केली आहे.

पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी पत्रकार परिषदेत आरोपांच्या फैरी झाडल्या. इतकी निर्घृण हत्या करणारे आरोपी मोकाट कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्रकरणात मोठी मागणी केली आहे.(Santosh Deshmukh Case)

खासदार बजरंग सोनवणे यांनी हा खून एकाकी झाला नसल्याचे सूतोवाच केले. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला. संतोष देशमुख यांचा खून झाला. या प्रकरणाची सुरुवात मे महिन्यात झाली. खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातून अनेक गोष्टी झाल्या. गुन्ह्यानंतर शिक्षा झाली नाही. हा विषय तिथेच थांबला. त्यानंतर २८ नोव्हेंबरला खंडणी मागण्यासाठी कुणाला तरी बोलावलं अशी माहिती आली.

२९ नोव्हेंबरला शिंदे आणि खोपटे नावाचे अधिकारी गेले. खंडणी मागितली. त्यावेळी कामं बंद करा, नाही तर आम्हाला येऊन भेटा, अशी माहिती आहे. अवडा कंपनीने काम बंद केलं नाही. त्यानंतर ६ डिसेंबर हा दिवस वेगळा दिवस आहे. देशाच्या दृष्टीने. आरोपींनी मस्साजोगच्या ऑफिसजवळ अधिकाऱ्यावर हल्ला केला. सोनावणे नावाच्या वाचमनलाही मारलं गेलं. त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. संतोष देशमुख यांना सेक्युरिटी गार्डने ही घटना सांगितलं. त्यांनी सरपंच देशमुखांकडे मदतीची मागणी केली, अशी माहिती खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.(Santosh Deshmukh Case)

पोलिसांवर दबाव?

खासदार सोनवणे पुढे म्हणाले, 6 डिसेंबर रोजी खंडणीसाठी आलेल्या आरोपींनी सरपंचाला मारहाण झाली. त्यानंतर काही लोकांनी मध्यस्थी केली. त्यानंतर आरोपी निघून गेले. त्यानंतर गार्ड आणि सरपंच देशमुखाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पण त्यांची फिर्याद घेतली नाही. तीन तास बसून ठेवलं. जातीवाचक शिवीगाळची फिर्याद घेतली नाही. थातूरमातूर फिर्याद घेतली.

त्यानंतर ९ तारखेला आरोपींना अटक दाखवून जामीन दिली. बीड जिल्ह्यात अशी घटना का घडली. साधी तक्रार घ्या. जातीवाचक शिवीगाळची तक्रार घेऊ नका असा कुणाचा फोन आला? कुणी सांगितलं. याचा शोध घ्या. यात पीएसआय इन्व्हॉल्व होते का? याचा शोध घ्या. आरोपींना जामीन झाल्यावर पीएसआय त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये जातात हे सर्वांनी पाहिलं आहे, असा आरोप देखील खासदार सोनवणे यांनी केला.(Santosh Deshmukh Case)

९ तारखेला घटना घडल्यावर सरपंचाच्या भावाला कोण बोलला. बनसोड नावाचा पोलीस अधिकारी होता. त्यांना कुणाचा फोन आला. त्यांचा सीडीआर काढा. पाटील आणि महाजन या अधिकाऱ्यांना कुणाचा फोन आला. त्यांचा सीडीआर काढा. तसं केलं तरच गुन्हेगार सापडतील, असे ते म्हणाले.

पोलीस म्हणतात चौथा आरोपी पकडला. तर सत्ताधारी पक्षाच्या आमदार म्हणतात आरोपी सरेंडर झाले. यात तफावत काय. खरं काय. चौथा आरोपी खून आणि खंडणीच्याही गुन्ह्यात आहे, असा दावा त्यांनी केला.

मारेकर्‍यांना फाशी द्या. मास्टर माईंडलाही शिक्षा झाली पाहिजे. एक दोन आरोपींना अटक करून फायदा काय. अजून तीन आरोपी फरार आहे. त्यांना कधी अटक करणार आहात? असा सवाल त्यांनी केला.(Santosh Deshmukh Case)

बीडमध्ये राष्ट्रपती शासन लावा- संजय राऊत यांची मागणी

बीड आणि परभणीच्या घटनांवरुनही खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. बीडची परिस्थिती अशी आहे की एका जिल्ह्यात राष्ट्रपती शासन लागू करावं. आपल्या घटनेत तशी तरतूद नाही. मी परिस्थिती सांगतो. तिथे सामाजिक राजकीय परिस्थिती गंभीर आहे. तिथे दंगल होईल, लोक रस्त्यावर येतील अशी परिस्थिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.

फक्त 20 रुपयांत भारतीय नागरिकत्व, बांग्लादेशी घुसखोरांना मिळाले आधार अन् मतदार कार्ड

मुख्यमंत्र्यांनी बीडला गेलं पाहिजे. ते गृहमंत्री आहेत. त्यांच्या लाडक्या धनुभाऊला घेऊन जावं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर या सरकारला दिसत नसेल तर हे सरकार माणुसकी शुन्य आहे. त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असं संजय राऊत म्हणाले.(Santosh Deshmukh Case)

आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात

बीड आणि परभणीत ज्या घटना घडल्या. त्यावर फडणवीस थातूर मातूर उत्तर देत आहेत. थातूरमातूर हा शब्द योग्य आहे. सरकारचे मंत्री बीडला जात आहे. काय काम आहे तिथे? बीडचा आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात. तुमच्या खात्यात. परभणीचा आरोपी अजूनही पोलीस खात्यात. ज्याने कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशीला मारलं. ते पोलीस खात्यात तुम्हाला सलाम करत आहेत. आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहात हे तुम्हाला शोभतं का? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

(Santosh Deshmukh Case)

More From Author

Delhi Crime News

Delhi Crime News: फक्त 20 रुपयांत भारतीय नागरिकत्व, बांग्लादेशी घुसखोरांना मिळाले आधार अन् मतदार कार्ड

Jammu

Jammu-Kashmir : पुंछमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत