Jammu-Kashmir : मंगळवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.
Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. मेंढर भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळले. या घटनेत 5 जवान शहीद झाले, तर अनेक जवान जखमी झाले आहेत. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात अनेक जवान होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जाणारे 11 एमएलआयच्या लष्करी वाहनाचा घोरा पोस्टजवळ अपघात झाला. वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत कोसळले.
अजमेर शरीफ दर्गा वाद चर्चेत; उद्धव ठाकरेंनी पाठवली चादर
भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला. “पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना वाहन अपघातात पाच शूर सैनिकांच्या दुःखद मृत्यूबद्दल #WhiteKnightCorps आम्ही शोक व्यक्त करतो. जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे,” असे या पोस्टमध्ये म्हटले.
Jammu-Kashmir