Election Commission : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. यावर आता निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे.
Election Commission: काही दिवसांपासून काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केंद्र सरकारवर, तसेच निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मंगळवारी (24 डिसेंबर 2024) काँग्रेसच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. ECI ने सांगितले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा जागेसाठी पक्षाने मागवलेला डेटा आणि फॉर्म 20 महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, तो डाउनलोड करुन पाहावा.
मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली?
महाराष्ट्र निवडणुकीच्या मतदार यादीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सविस्तर उत्तरे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले की, काँग्रेसने दिलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत 80 हजार 391 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती. म्हणजे एका विधानसभेतून सरासरी 2779 मतदार काढून टाकण्यात आले. Election Commission:
संपूर्ण प्रक्रियेचे पालन केले
यावर निवडणूक आयोगाने म्हटले की, जी नावे हटवण्यात आली आहेत, त्यांच्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे पालन करण्यात आले आहे. नोटीस जारी करण्याबरोबरच, अशा प्रकरणांमध्ये मतदाराचा मृत्यू झाला आहे, किंवा त्याचा पत्ता बदलला आहे, किंवा तो आता त्या पत्त्यावर राहत नाही, याची खात्री करण्यासाठी क्षेत्र सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतरच मतदारांची नावे मतदारातून काढून टाकण्यात आली. यादी
काँग्रेसला दिलेल्या उत्तरात निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्ष किंवा उमेदवारांच्या सक्रिय सहभागाची सुमारे 60 उदाहरणे दिली. निवडणूक आयोगाने म्हटले की, राजकीय पक्ष/उमेदवारांचा अर्थपूर्ण सहभाग हा भारतीय निवडणूक प्रक्रियेचा प्रमुख आधारस्तंभ आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तक्रारींबाबत काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगाकडे अनेक आकडे मागितल्याचे सांगितले होते.
Election Commission